
Santosh Movie: ऑस्कर स्पर्धेतील ‘या’ चित्रपटावर भारतातच प्रदर्शनाला नकार!
भारतातून आजवर अनेक चित्रपट प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवले गेले. मात्र, अपेक्षित यश तिथे न मिळाल्यामुळे प्रत्येक भारतीय चित्रपट मेकर्स आणि प्रेक्षकांचाही हिरमोड झालाच. अशातच अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हिने दखील भारतीय चित्रपटांना ऑस्करमध्ये बऱ्याचदा डावललं गेलं आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे चर्चेत असणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा अधोरेखित झाला. पण आता युनायटेड किंग्डमकडून भारतीय चित्रपट ‘संतोष’ (Santosh) जो ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता त्यावर भारतातच बंदी घालण्यात आली आहे. काय आहे कारण वाचा…(Oscar Awards)

संध्या सूरी या भारतीय-ब्रिटीश निर्मात्या असून त्यांचा‘संतोष’ हा चित्रपट युनायटेड किंगडमने ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवला होता. हा चित्रपट ऑस्करच्या यादीत शॉर्टलिस्टही झाला होता. परदेशात नाव कमावलेल्या या चित्रपटाला मात्र आपल्याच देशात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने बंदी घातली आहे. या चित्रपटात दाखवलेल्या संवेदनशील मुद्द्यांवर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाने मोठ्या प्रमाणात सीन्स कट्स करण्याची मागणी केली आहे. (Oscar awards 2024-45)
===========================
हे देखील वाचा:Deepika Padukone : पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाचा जलवा!
===========================
‘संतोष’ (Santosh) या चित्रपटात स्त्रीयांशी संबंधित गंभीर मुद्दे, इस्लामोफोबिया आणि पोलिसांविरुद्ध हिंसाचार असे बरेच विषय हाताळण्यात आले आहेत. आणि याट कारणांमुळे CBFC ला चित्रपटातील काही दृश्यं आणि संवाद खटकले आहेत. यावर दिग्दर्शक संध्या सूरी यांनी असं म्हटलं की, “सेन्सॉर बोर्डाने इतक्या मोठ्या प्रमाणात कट्सची यादी पाठवली आहे की, ती लागू करणं जवळपास अशक्यच आहे. बोर्डाच्या मते जर हे कट्स केले तर ‘संतोष’ चित्रपटाची मूळ कथा आणि संदेश पूर्णपणे बदलून जाईल”. त्यामुळे आता संतोष चित्रपटाची टीम काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे आहे. (Entertainment trending news)

Santosh चित्रपटात अभिनेत्री शाहाना गोस्वामीची प्रमुख भूमिका असून आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या अभिनयातून प्रचंड कौतुक झालं आहे. एकीकडे परदेशात हा चित्रपट प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आणि कौतुक मिळवत असताना आपल्याच भारत देशात भारतीय चित्रपटावर अशी बंदी घालणं प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरवत आहे. काहींच्या मते, हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे, तर काही जणं सेन्सॉर बोर्डाच्या संवेदनशीलतेचे समर्थन करत आहेत. सोशल मिडीयावर आणि सर्वत्र ‘संतोष’ चित्रपटाची चर्चा असून CBFC काय अंतिम निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. (Bollywood news update)