
Satyabhama Movie : सती प्रथेवर आधारलेला ‘सत्यभामा’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज
मराठी चित्रपटसृष्टीत कायम वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येत असतात… प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दिग्दर्शक, लेखक, कलाकार कायम आऊट ऑफ द बॉक्स काय देऊ शकतो याचा सातत्याने विचार करत असतात.. बायोपिक्स, राजकीय चित्रपट, ऐतिहासिक चित्रपटांच्या सोबतच कायम महिला प्रधान (Female Centric Movies) चित्रपटांनीही प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे… आजवर भारतीय चित्रपटसृष्टीत विशेष स्थान कमावणाऱ्या महिला प्रधान चित्रपटांच्या यादीत ‘सत्यभामा’ (Satyabhama Marathi Movie) या चित्रपटाची भर पडली आहे… हा चित्रपट कधी रिलीज होणार आणि याचं कथानक काय असणार थोडक्यात जाणून घेऊयात…
सती प्रथेवर आधारित असणाऱ्या ‘सत्यभामा’ या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं…मोशन पोस्टरवर आगीत होळपरणाऱ्या स्त्रीचा हात धरलेला पुरुषाचा हात पाहायला मिळतो. पुरूषाच्या हातात राखी दिसत आहे. मनाला चटका लावणारे हे पोस्टर ‘सत्यभामा’बाबत उत्सुकता वाढविण्याचे काम करणारे आहे. हा चित्रपट मनीषा पेखळे यांनी लिहिलेल्या ‘सत्यभामा – एक विसरलेली गाथा’ या कादंबरीवर आधारलेला आहे. ही कथा सती प्रथेला बळी पडलेल्या सर्व निष्पाप स्त्रियांना समर्पित असून सतीचे दु:ख जगासमोर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे. १९व्या शतकातील ही काल्पनिक कथा आहे.(Marathi movies)
================================
=================================
सारंग मनोज आणि अभिजीत झाडगावकर यांचं दिग्दर्शन असणाऱ्या सत्यभामा चित्रपटात माधव अभ्यंकर, अभिजीत आमकर, भाविका निकम, सृष्टी मालवंडे, ज्योती पाटील, सारंग मनोज, ज्ञानेश्वर शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.. ८ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्रभरात सत्यभामा चित्रपट रिलीज होणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi