Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

saudagar : अमिताभ-नूतनचा अप्रतिम सिनेमा
नूतन या अभिनेत्रीने पन्नास आणि साठच्या दशकात आपल्या अभिनयाने हिंदी सिनेमाला समृध्द केले होते. सत्तरच्या दशकात ही काही चित्रपटातून आपल्या मनोहारी अभिनयाचे दर्शन दिले. यातील एक चित्रपट होता ‘सौदागर’ (saudagar). १९७३ साली आलेल्या या सिनेमात तिचा नायक होता अमिताभ बच्चन. नरेंद्रनाथ मित्र या बंगाली लेखकाची ‘रास’ नावाची ही एक साधी, सुलभ भावस्पर्शी कथा होती. ‘सौदागर’ ४६ व्या अकादमी अवार्ड करीता भारतातून पाठविला गेला होता. गंमत म्हणजे ज्या सिनेमाने Amitabh Bachchan ला अंग्री यंग मनचा किताब बहाल केला तो ‘जंजीर‘ ११ मे १९७३ रोजी प्रदर्शित झाला आणि सुपर हिट ठरला आणि त्यानंतर पाच महिन्यांनी म्हणजे २६ ऑक्टोबर १९७३ रोजी ‘सौदागर’ प्रदर्शित झाला. पण त्याला गुणवत्ता असूनही हवे तेवढे यश नाही मिळाले. या चित्रपटातील सर्वच कलाकारांचा अभिनय अप्रतिम झाला होता. रवींद्र जैन यांच्या गीत संगीताने बहार आणली होती. हा चित्रपट त्यानंतर जेव्हा रिपीट रनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये झळकला तेव्हा मात्र प्रेक्षकांनी गर्दी केली. आजही राजश्रीचा एक ‘क्लासिक’ म्हणून याचा उल्लेख होतो.

चित्रपटाचे कथानक अतिशय साधे मनाला भावणारे असे आहे. मोती (अमिताभ बच्चन) एक व्यापारी असतो. खजुराच्या झाडापासून बनवलेला गूळ तो विकत असतो. एकदा त्याची गाठ ‘फुलबानो’ (पद्मा खन्ना) या तरुणीशी पडते. तिच्या उफाड्या सौंदर्याच्या तो प्रेमात पडतो. तिच्याशी निकाह लावण्यासाठी तो तिच्या अब्बाला भेटतो. पण मोतीकडे ५०० रू. हुंड्याची मागणी करतात. एवढी मोठी रक्कम त्याच्याकडे नसते. तिच्या सौंदर्याने तर तो पुरता घायाळ झालेला असतो. त्याच्यातील हिशेबी मन एक सौदा करायला त्याला भाग पाडते. (saudagar)
त्याच गावात एक महाजुबी नावाची गरीब स्त्री रहात असते. ती गूळ बनविण्यात पारंगत असते. मोती तिच्याकडून गूळ घेवून विकत असतो. तिने बनविलेल्या गुळाला बाजारपेठेत मोठी मागणी असते. मोती तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवतो. यात त्याचे दोन हेतू असतात. एक तर ती गूळ फक्त त्याच्यासाठीच बनवेल आणि त्याचे त्याला पैसे ही द्यावे लागणार नाहीत. गरीब पण प्रामाणिक महाजुबीला मोतीचा कुटील हेतू लक्षात येत नाही. अचानक पणे आयुष्यात आलेल्या सुखाने ती हरखून जाते. ती निकाह करण्यास तयार होते. आता मोतीचा धंदा वधारतो. या सिझनमध्ये तो चांगलेच पैसे कमावतो. हाती पैसा आल्यावर तो ‘फुलबानो’च्या वडलांकडे जावून ‘मेहेर’ अदा करतो आणि तिला पत्नी बनवून घरी आणतो. ()

आता मोतीने महाजुबीला फारकत दिल्याने ती पुन्हा एकाकी, निराश्रीत होते. दु:खाचे डाग सोसत ती घराबाहेर पडते. इकडे मोतीचा नवा संसार सुरू होतो. लग्नाची नवलाई काही दिवसातच संपते. पुन्हा गुळाचा हंगाम सुरू होतो. खजुराचा रस घेवून तो घरी येतो पण हे नवी नवरी फक्त छानचौकी करणारी नखरेल दुल्हन असते. कष्टाची कामे तिला जमतच नाहीत. तिने बनवलेला गूळ बाजारात कुणीच घेत नाही. मोती भोवती पडणारा गिऱ्हाइकांचा गराडा कमी होवू लागतो. मोती वैतागतो. पती पत्नीत भांडण होवू लागतात. त्याला महाजुबीची आठवण येते तिच्या कष्टाची त्याला जाणीव होते. पण आता महाजुबीने एका वयस्क इसमासोबत निकाह लावलेला असतो. (saudagar)
चित्रपटाच्या अखेरीस मोती पुन्हा महाजुबीकडे जातो आपली दर्दभरी कहाणी ऐकवतो. ‘फुलबानो’ सर्व पहात असते. महजुबी मोतीकडे एक कटाक्ष टाकते. तिला धोका देणाऱ्या सौदागराला दयनीय अवस्थेत पाहून ती द्रवते. ‘फुलबानो’ तिच्याकडे ‘आपा’ म्हणून साद घालते. दोघी भरल्या डोळ्यांनी मिठी मारतात. ती मोतीला माफ करते का? पुन्हा त्याच्या साठी ती गूळ बनविण्याचे काम सुरू करते का? इथे दिग्दर्शक कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देत नाही. पण अखेरच्या दृश्यातून प्रेक्षक सर्व काही आलबेल झाल्याचा अंदाज बांधतात.
==============
हे देखील वाचा : Dharmendra : धर्मेंद्रच्या तीन दशकातील तीस नायिका!
==============
नूतनचा अभिनय अतिशय वरच्या श्रेणीचा होता. बिमल दांच्या चित्रपटातून दिसणारी नूतन इथे दिसते. अमिताभने लुंगी आणि कुर्त्यामधील मोती खूप चांगला साकारला होता. पद्मा खन्ना vamp आणि कॅबरे करीता लोकप्रिय असताना तिला यात एक पूर्ण लांबीची भूमिका मिळाली होती. सुधेन्द्रू रॉय यांनी बिमलदा सोबत बरेच काम केल्याने दिग्दर्शनात तो टच जाणवतो. सात्विक सौंदर्याच्या नूतनला तिच्या नैसर्गिक अभिनयाने आजही हा सिनेमा तितकाच मनाला भावतो. (saudagar)
या चित्रपटाचे चित्रीकरण केरळमधील एका खेड्यात झाले होते. या सिनेमाचे संवाद एकेकाळचा ख्यातनाम दिग्दर्शक पी एल संतोषी यांनी लिहिले होते. यातली गाणी खूपच गोड आणि श्रवणीय होती. हर हंसी चीज का मैं तलबगार हूं (किशोर कुमार), तेरा मेरा साथ रहे धूप हो छाया हो दिन हो के रात रहें (लता मंगेशकर), सजना है मुझे सजना के लिये (आशा भोसले) दूर हैं किनारा (मन्ना डे) संगीतकार रवींद्र जैन यांचा हा पहिला लोकप्रिय चित्रपट ठरला.