
“सरकार आपलं असूनसुद्धा बेजबाबदार वागतंय”; कुंभमेळ्यासाठी झाडे तोडण्याच्या विरोधात Sayaji Shinde
अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) केवळ मराठीच नाही तर हिंदी आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही फेमस आहेत… अभिनयासोबतच सामाजिक कार्य आणि आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत असणाऱ्या सयाजी शिंदे यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याबद्दल एक महत्वाचं विधान केलं आहे…नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा हा भाविकांसाठी सर्वात मोठा धार्मिक उत्सव असतो, परंतु, दुर्देवाने या भव्य उत्सवाची किंमत निसर्गाला मोजावी लागणार असं चित्र दिसतंय… कुंभमेळ्यासाठी नाशिकच्यातपोवनातील तब्बल १७०० झाडे तोडणे, पुर्नरोपण करणे वा फांद्यांची छाटणी करावी लागणार असल्याची नोटीस महापालिकेने दिली असून याचा तीव्र संताप पर्यावरणप्रेमी आणि कलाकारांनी केला आहे.. यात सयाजी शिंदे यांनीही थेट सरकारला खडे बोल सुनावले आहेत…
सयाजी शिंदे यांनी नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी तोडल्या जाणाऱ्या वृक्षांचा तीव्र निषेध करत टिव्ही ९ मराठीशी बोलताना ते म्हणाले की, “नाशिकच्या तपोवनमधील झाडे तोडणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. मला अनेक फोन येत आहेत. एक झाड तोडून दहा झाडे लावू असे विधान गिरीश महाजन यांनी केलं. मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने असे बोलणे योग्य नाही किंवा त्यांचे विधान बेजबाबदार आहे. असं बोलून ते काय चेष्टा करत आहेत का. तपोवनामध्ये जुनी झाडे आहेत. ते म्हणत आहेत की एक झाड तोडून दहा झाडे लावू. आम्ही म्हणतोय की एक झाड वाचवण्यासाठी १०० माणसं मरायला तयार आहोत, पण ते झाड तोडू देणार नाही“. (Marathi Entertainment News)

पुढे सयाजी म्हणाले की, “नागपूरातही झाडे तोडली जात आहे. तसेच लोणंद रस्त्यावर वृक्षतोड केली जात आहेत. त्या रस्त्यावरील ४०० झाडे ही वडाची आहेत. आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष बेपर्वाईने तोडला जातोय. सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे तो. सरकार कधी जागं होणार आहे. कधी कायदा करणार आहे. एक वृक्ष तोडल्यावर १ ते २ हजार रुपयांचा दंड होतो. ही काय शिक्षा आहे. असं भयानक चित्र आहे. मनुष्य जात ही लवकर संपणार आहे, त्यानंतर झाडे संपतील, हे कुणी लक्षात घेत नाही. झाडे लावण्याच्या वेगापेक्षा झाडे तोडण्याचा वेग आपल्याकडे जास्त आहे. ही दुर्देवी गोष्ट आहे”. (Nashik Kumbhamela)
================================
================================
तर, दुसरीकडे एबीपी माझाशी बोलताना सयाजी म्हणाले की, “सरकार आपलं असूनसुद्धा बेजबाबदार वागतंय. झाडांच्याबाबतीत सरकार चुकीचं वागतं, याचा मला फार अनुवभव आहे. मला सूचत नाही अजून काय करावं. आपल्या डोळ्यांसमोर जी झाडे तोडली जात आहेत, ती आपण वाचवली पाहिजेत. नाहीतर एक दिवस माणसं पेटून उठतील. राज्य सरकारने डोळे उघडले पाहिजेत. आपल्याकडे लोकशाही आहे की हुकुमशाही हेच समजत नाही. झाडांवर राजकारण करू नका. लोकांनी आवाज उठवला की तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. पण बोलणाऱ्याला बोलता आले पाहिजे. सगळेच आता ढोगींपणा करत आहेत. हे सर्वांना कळतंय. आता त्याचा उद्रेक होण्याची वेळ आली आहे”. आता सरकार सयाजी शिंदेंसह इतर पर्यावरणप्रेमींच्या निषेधाचा विचार करुन ही वृक्षतोड थांबवणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi