‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
लक्षात राहिलेली ज्योतिका
सध्या स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका तुफान लोकप्रिय होत आहे. या मालिकेत सर्वांचीच कामे चांगली आहेत.
सायली मुळात कल्याण येथे राहणारी. के एम अग्रवाल कॉलेजमधून तिचे शिक्षण झाले. लहानपणापासून तिला अभिनयाचीआवड होती. तिचे वडील पोलीस सेवेत कार्यरत आहेत. स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ या मालिकेत तिने नायिकेच्या बहिणीची भूमिका केली होती.
महाराष्ट्र टाइम्सच्या ‘श्रावण क्वीन’ स्पर्धेतही तिने सहभाग घेतला होता. सोनी लिव्ह वरील ‘फुल टाईट’ या वेब सिरीज मध्ये तिची भूमिका होती. या अनुभवाविषयी ती म्हणते, “या वेब सीरिजच्या निमित्ताने खूप काही शिकता आलं. यतीन कार्येकर यांचे एक कलाकार म्हणून उत्तम मार्गदर्शन मला लाभले. मला आठवतंय की एखादे दृश्य सादर करताना काही कमी पडत असेल, तर स्वतः यतीन कार्येकर ते दृश्य कसे करता येईल, हे सांगायचे. हा अनुभव खूप काही शिकवणारा ठरला.“
हेही वाचा : अभिनयाचा ध्यास
या लॉकडाऊनच्या काळात सागरिका म्युझिक चा ‘सुवासिनी’ हा व्हिडीओ प्रदर्शित झाला, त्यातही तिने काम केले आहे. तिच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’. सायली सांगते,”खरोखरच आम्ही या मालिकेच्या सेटवर खूप धमाल करतो.
वर्षा उसगावकर तर या इंडस्ट्रीत खूप सिनिअर आहेत. पण आम्हा नवोदित कलाकरांना सुद्धा त्या उत्तम सहकार्य करतात. सेटवर त्या आमच्यातील एक होऊन जातात. यातल्या माई प्रमाणे खरेच त्या प्रेमळ आहेत.
संपूर्ण युनिट उत्तम आहे. नुकताच सेटवर माझा वाढदिवस देखील साजरा झाला. खरंच, सुख म्हणजे नक्की काय असतं ! “या मालिकेत आता ज्योतिकाची व्यक्तिरेखा एका वेगळ्या वळणावर आली आहे.
सायली साळुंखे आता ज्योतिकाच्या व्यक्तिरेखेत कशा रीतीने आपल्या समोर येणार आहे, हे आपणाला लवकरच कळेल.