प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

घरच्या घरी सिरत कपूरचा मेकओव्हर
सीरत कपूर ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री असून तिने रणबीर कपूर अभिनीत फिल्म रॉकस्टार (२०११ चित्रपट) साठी सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून तिच्या करियरची सुरुवात केली. 2014 साली तिने रन राजा रन (तेलगू चित्रपट) मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
सध्या इतर कलाकारांप्रमाणेच अभिनेत्री सीरत कपूर सध्या क्वारंटाईन मध्ये साफसफाई आणि बाकीच्या घरकामात स्वतःला व्यस्त ठेवत आहे. शूटिंग होत नसल्यामुळे स्वतःला मेकअपपासून तिने दूर ठेवले आहे. नुकताच अभिनेत्री सीरत कपूरने एक व्हिडिओ आणि तिच्या नवीन लूकचा फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी आपले कुरळे केस सरळ केले आणि आपले मेकअप लुक प्रदर्शित केले. घरबसल्या मेकअप आणि स्वतःचा लुक कसा करावा याचा धडाच तिने इतरांसाठी तयार केला आहे.
सीरत कपूर ने चित्रपटात २०१४ साली दोन वेगळ्या चित्रपटात पदार्पण केले. “झिद” आणि “रन राजा रन” ह्या व्यतिरिक्त तिने “टायगर”, “कोलंबस”, “राजू गॅरी गाधी” आणि आता आगामी चित्रपट सिद्दू जोनालगड्डा बरोबर “कृष्णा अँड हिज लीला” मध्ये दिसणार आहे.