
DDLJ : शाहरुखच्या चित्रपटाचा लंडनमध्ये सन्मान, ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय चित्रपट
“जा सिमरन जी ल अपनी जिंदगी…” या आयकॉनिक डायलॉगला ३० वर्ष लवकरच पुर्ण होणार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अजरामर चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ). काजोल (Kajol) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) या जोडीने या चित्रपटातून त्यांचा लाईफटाईम चाहतावर्ग निर्माण केला. १९९५ मध्ये आलेल्या DDLJ या चित्रपटाला देशासह जगभरातून तुफान प्रतिसाद मिळाला. आजही मुंबईच्या मराठा मंदिरला DDLJ चा शो सुरुच आहे. राज-सिम्रनच्या एव्हरग्रीन लव्हस्टोरीला ३० वर्षे पूर्ण होणार असल्यामुळे एक विशेष घोषणा करण्यात आली आहे.(Entertainment tadaka)

२० ऑक्टोबर १९९५ मध्ये रिलीज झालेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (Dilwale Dulhaniya Le Jayenge) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला. या वर्षी चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण होणार असल्याने लंडनमध्ये खास राज-सिम्रनच्या जोडीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानास्पद गोष्ट असून लंडनमध्ये शाहरुख आणि काजोल अर्थात राज-सिमरन या आयकॉनिक जोडीचा कांस्य पुतळा बसवला जाणार आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे तर परदेशातील प्रेक्षकांच्या मनावर सुद्धा अधिराज्य केलं. लंडनमध्ये बॉलीवूड चित्रपटातील पात्रांचा पुतळा उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे.(Bollywood news)
===============================
हे देखील वाचा: Dilwale Dulhania Le Jayenge मध्ये फाईट सीन टाकण्याची आयडीया कुणाची होती?
==============================
‘हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्स’ने आज पुतळा उभारण्यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली असून लेस्टर स्क्वेअरमधील ‘सीन्स इन द स्क्वेअर’ या चित्रपटाच्या ट्रेलमध्ये हा नवीन पुतळा बसवला जाणार आहे. सध्या तेथे ‘हॅरी पॉटर’ (Harri Potter), ‘लॉरेल अँड हार्डी’, ‘बग्स बनी’, ‘सिंगिंग इन द रेन’मधील जीन केली, ‘मेरी पॉपिन्स’, ‘मिस्टर बीन’, ‘पॅडिंग्टन अँड डीसी सुपर-हिरो बॅटमॅन’ आणि ‘वंडर वुमन’ (Wonder Women) या चित्रपटांमधील पुतळे आहेत. आता यांच्या जोडीसोबत शाहरुख-काजोलचा (Shah Rukh Khan And Kajol) ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ मधील राज-सिमरनचा पुतळा बसवला जाणार आहे.(DDLJ Bollywood iconic movie)