Ashi Hi Banwa Banwi :चित्रपटातील लीलाबाई काळभोर यांचा बंगला नेमका

सुहाना खान करणार शेती? २३ वर्षातच खरेदी केली करोडोंची जमीन
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान देखील इतर स्टार किड्सप्रमाणे चर्चेत असते. गेल्या काही काळापासून सुहाना तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. झोया अख्तरच्या ‘द आर्ची’ या चित्रपटातून ती सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. दरम्यान, सुहानाने शेतीसाठी जमीन खरेदी केल्याचे वृत्त समोर आले आहे. शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खान आता शेती करण्याच्या मनःस्थितीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुहानाने अलिबागच्या थळ गावात शेतीसाठी जमीन खरेदी केली आहे. नोंदणी कागदपत्रांनुसार, सुहाना ही एग्रीकल्चरिस्ट असल्याचे सांगण्यात आले आहे.(Suhana Khan Property)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुहाना अभिनयात नक्कीच तिच नशीब आजमावणार आहे, पण शेतीसाठी खरेदी केलेल्या या जमिनीवरील नोंदणी च्या कागदपत्रांवर तिने स्वत:ला शेतकरी म्हणून वर्णन केले आहे. या बातमीने आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या सर्व समोर आलेल्या बातम्यांमुळे,आता सुहाना खान अभिनयासोबतच शेती ही करू लागली आहे का?असा प्रश्न सर्वांना पडलाय. सुहानाच्या खरेदी केलेल्या जमिनीची किंमत १२ कोटी ९१ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या जमिनीचा व्यवहार 1 जून रोजी झाला होता. त्यासाठी सुहानाने स्वत: ७७ लाख ४६ हजार रुपयांचे स्टॅम्प ड्युटी भरले आहे. सुहानाने तीन बहिणींकडून (अंजली, रेखा आणि प्रिया) दीड एकरची ही जमीन विकत घेतल्याचे बोलले जात आहे. ही जमीन त्यांना आई-वडिलांकडून वारसाने मिळाली आहे.

सुहाना खानने शेती खरेदी करण्यापूर्वी शाहरुख खानने अलिबागमध्ये आलिशान बंगलाही बांधला होता. अलिबागमध्ये किंग खानचा समुद्रकिनारी बंगला आहे, ज्यात स्विमिंग पूल आणि हेलिपॅड देखील आहे.अभिनेत्याने आपला ५२ वा वाढदिवस सुद्धा अलिबागमध्ये साजरा केला होता.सुहानाच्या बॉलिवूड करिअरबद्दल बोलायचे झाले तर चाहते बऱ्याच दिवसांपासून तिच्या डेब्यूची वाट पाहत आहेत, आणि तिच्या चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण ही होणार आहे. सुहानाचा पहिला चित्रपट ‘द आर्ची’ ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. (Suhana Khan Property)
===========================
हे देखील वाचा: Adipurush मधील हनुमानाचे ‘ते’ डायलॉग बदलले; तिकिटांची किंमत ही केली कमी
===========================
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. आणि सुहाना खानव्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील द आर्चीमधून डेब्यू करत आहेत. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो याचीच प्रेक्षक वाट पाहत आहेत.