ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
शाहरुख खानने ‘हा’ चित्रपट अजुन पाहिलेला नाही…
संघर्षाच्या काळात कधी कधी अनपेक्षितपणे यशाचे दार उघडले जाते आणि पुढचा मार्ग सुकर होतो. काहींना ही संधी लवकर मिळते तर काहींना आयुष्यभर संघर्ष करतच रहावा लागतो. हा कुठेतरी प्राक्तनाचा भाग असतो. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला राजकंवर एक चित्रपट निर्माण करत होते. या चित्रपटात ऋषी कपूर नायकाच्या भूमिकेमध्ये तर दिव्या भारती नायिकेच्या भूमिकेसाठी फायनल झाली होती. या चित्रपटात एका सहनायकाची देखील महत्वपूर्ण भूमिका होती. या भूमिकेसाठी त्यावेळी साउथमधला फेमस नागार्जुन याला घ्यायचे ठरले. त्याच्यासोबत दोन-तीन मीटिंग पण झाल्या. नागार्जुन यांना ही भूमिका आवडली तो तयार देखील झाला. परंतु त्याच्या साउथकडील व्यस्त शेड्युलमुळे डेट्सचा इशू निर्माण झाला. त्यामुळे नागार्जुनचा पत्ता कट झाला. आता या भूमिकेसाठी कुणाला घ्यायचे यावर चर्चा सुरू झाली. बरीच नावे पुढे आली. काहींच्या स्क्रीन टेस्ट झाल्या. पण कुणाच्याच नावावर एकमत होत नव्हते. शेवटी राजकुमार कोहली यांचा मुलगा अरमान कोहली याला या भूमिकेसाठी घेतले. शूटिंग सुरू झाले. पण काही दिवसानंतर अरमान कोहलीच्या असे लक्षात आले की, आपण या चित्रपटाचे नायक नसून सहनायक आहोत. मुख्य नायक तर ऋषी कपूर आहे आणि आपली एन्ट्रीच सिनेमाच्या इंटर्वल नंतर होते आहे. त्यामुळे यातून आपल्याला काय फायदा? असा व्यावसायिक विचार अरमान कोहलीने केला. राजकंवर यांनी या भूमिकेचे वेगवेगळे पैलू आणि कंगोरे सांगितले. पण अरमान कोहलीचे काही समाधान झाले नाही. दोघांमधील वाद दिवसेंदिवस वाढत होते. अरमान कोहली ऋषी कपूरची भूमिका कमी करून आपली भूमिका वाढवावी असा आग्रह दिग्दर्शकाकडे धरू लागला. राजकंवरने अर्थातच याला विरोध केला आणि एके दिवशी अरमान कोहलीनेच हा सिनेमा सोडला. पुन्हा शूटिंग ठप्प झाले. आता कुणाला घ्यायचे? बऱ्याच चर्चा झाल्यानंतर असे ठरले की, अभिनेत्री हेमामालिनी एका चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे आणि त्यात एका दिल्लीहून आलेल्या अभिनेत्याला ब्रेक देत आहे. हा अभिनेता दूरदर्शनच्या काही मालिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आला होता. या अभिनेत्याला कॉन्टॅक्ट केले गेले आणि त्याने या चित्रपटातील भूमिकेचा स्वीकार केला!
पहिलाच चित्रपट त्यात एंट्री देखील इंटरवलच्या नंतर. भूमिका देखील सेकंड लिडची. पण या सर्व इतरांना नकारात्मक वाटणाऱ्या बाजू या अभिनेत्याने पॉझिटिव्हली घेऊन चित्रपटात जबरदस्त भूमिका केली. या पहिल्याच भूमिकेने त्याने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्यातील अभिनय पाहून काहीजण त्याची तुलना थेट दिलीप कुमार सोबत करू लागले. चित्रपट सुपर डुपर हिट झाला. यातील गाणी कमालीची गाजली. या अभिनेत्याला फिल्मफेअरचे बेस्ट डेब्यू मेल ॲक्टर हे अवॉर्ड देखील मिळाले आणि भारतीय सिनेमा एका सुपरस्टारचा जन्म झाला. हा चित्रपट होता 1991 साठी प्रदर्शित झालेला ‘’दिवाना’ आणि पहिल्याच चित्रपटातून रसिकांच्या आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेणारा हा अभिनेता होता शाहरुख खान(Shahrukh Khan Story)!
जाता जाता थोडंसं ‘दिवाना’ या चित्रपटाबद्दल. दिग्दर्शक राजकंवर यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. त्यापूर्वी त्यांनी शेखर कपूर यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटांसाठी काम केले होते. या चित्रपटात सह नायकाच्या भूमिकेसाठी सनी देओल, अनिल कपूर यांचा देखील विचार झाला होता. ज्यावेळी अरमान कोहली चित्रपटातून बाहेर पडला, त्यावेळी सलमान खान याने या सिनेमांमध्ये ‘इंटरेस्ट’ दाखवला होता. पण त्याने जे मानधन मागितले होते ते निर्मात्याला परवडणारे नव्हते. ‘दिवाना’ हा चित्रपट १९९२ सालच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटाच्या यादीतील दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट होता. पहिल्या क्रमांकावर अनिल कपूर, माधुरी दीक्षित चा ‘बेटा’ हा चित्रपट होता. ‘दिवाना’ हा चित्रपट म्युझिकल हिट सिनेमा होता. या चित्रपटाच्या तब्बल ८० लाख कॅसेटसची विक्री महिनाभरात झाली होती. सिनेमातील प्रत्येक गाण्याने त्याकाळी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. समीर यांच्या शब्दाला नदीम श्रवण यांचे संगीत होते. यातली गाणी कुमार सानू, विनोद राठोड, अलका याज्ञिक आणि साधना सरगम यांनी गायली होती. ‘सोचेंगे तुम्हे प्यार करे या ना करे’, तेरी उम्मीद तेरा इंतजार करते है’,’ पायलिया गीत सुनाये’, ‘तेरी इसी अदा पे सनम’,’ कोई ना कोई चाहिए प्यार करने वाला’,’ ऐसी दिवानगी देखी नही कभी’,’ तेरे दर्द से दिल आजाद रहा’ ही गाणी तरुणाईच्या ओठावर खेळत होती.
या सुपरहिट सिनेमाला फिल्मफेअरचे तब्बल आठ नामांकन मिळाली होती. त्यापैकी दिव्या भारती- फेस ऑफ द इयर, शाहरुख खान- (Shahrukh Khan Story)बेस्ट मेल डेब्यू, ‘तेरी उम्मीद से तेरा इंतजार’ या गाण्यासाठी गीतकार समीर यांना तर ‘सोचेंगे तुम्हे प्यार करे या ना करे’ या गाण्यासाठी गायक कुमार सानू यांना फेअर फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले.
=======
हे देखील वाचा : अमिताभ बच्चन राखीला ‘दिदी’ म्हणून का संबोधत होता?
=======
गंमत म्हणजे ऋषी कपूर यांच्या वडिलांनी म्हणजेच राज कपूर यांनी या सिनेमाच्या पंचवीस वर्षे आधी १९६७ साली याच नावाचा एक चित्रपट केला होता त्यात त्यांची नाही का सायरा बानो होती. खरंतर शाहरुख खान (Shahrukh Khan Story)हेमा मालिनीच्या ‘दिल आशना है’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा साईन केला गेला होता. परंतु त्याचा पहिला रिलीज झालेला चित्रपट हा ‘दिवाना’ हाच होता. जर अरमान कोहली याने चित्रपटातून एक्झिट घेतली नसती तर कदाचित शाहरुख खान (Shahrukh Khan Story)याच्या हिट सिनेमाला यायला आणखी वेळ लागला. एनी वे शाहरुख चा पहिला चित्रपट म्हणून ‘दिवाना’चा उल्लेख कायम होत राहील. त्यात आणखी एक गमतीची बाब म्हणजे शाहरुख खानने हा चित्रपट अजुन पाहिलेला नाही. त्याच्या मते तो त्याचा ‘पहिला’ आणि ‘शेवटचा’ सिनेमा कधीच पाहणार नाही!
धनंजय कुलकर्णी