Television Serial War: स्टार प्रवाह मालिका विरुद्ध झी मराठी मालिका; TRP च्या

Shammi Kapoor : ‘रफी शिवाय माझं रुपेरी आयुष्य शून्य आहे’ असं शम्मी कपूर का म्हणाले होते?
दिलीप कुमार, राज कपूर आणि देव आनंद या सदाबहार त्रिकुटा सोबतच शम्मी कपूर यांचा देखील जबरदस्त स्टारडम साठच्या दशकामध्ये होता. एक वेगळा फॅन फॉलोईंग त्यांचा होता. खरंतर सुरुवातीचे त्यांचे पंधरा-वीस सिनेमे अक्षरश: सुपर फ्लॉप झाले होते. पण नासिर हुसेन यांच्या ‘तुमसा नही देखा’ या १९५७ सालच्या चित्रपटापासून त्यांचा कम्प्लीट मेक ओव्हर झाला आणि जबरदस्त असा करिष्मा सुरू झाला. शम्मी कपूर आणि मोहम्मद रफी हे कॉम्बिनेशन या सिनेमापासून अगदी परफेक्ट झालं. यानंतर पुढची दहा-बारा वर्ष या दोघांनी प्रचंड धुमाकूळ घातला. शम्मी कपूर वर चित्रित होणारी रफी जेंव्हा गाणी गात असताना ते स्वतः रेकॉर्डिंग स्टुडिओला उपस्थित असायचे. या गाण्यांमध्ये आपल्याला नेमकं काय पाहिजे ते रफीला सांगायचे.

एकदा एका गाण्याच्या रेकॉर्डिंगला शम्मी कपूर उपस्थित राहू शकले नाही. गाणं तर रेकॉर्ड झालं. शम्मी कपूर खूप नाराज झाले; पण नंतर जेव्हा त्यांनी ते गाणं ऐकलं तेव्हा त्यांनी रफी यांना फोन करून सांगितले की, ”तुम्ही अगदी परफेक्ट मला पाहिजे तसं गायला आहात. माझ्या भावना तुमच्याशिवाय आणखी कोणी समजू शकत नाही!” रफी आणि शम्मी कपूर म्हणजे दो जिस्म मगर एक जान है हम असं त्या काळात झालं होतं. या दोघांची तब्बल १९० गाणी आहेत आणि यातील ९० % गाणे प्रचंड लोकप्रिय आहेत. ‘बदन पे सितारे लपेटे हुए’, ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’, ‘इशारो इशारो मे दिल लेने वाले’, ‘याहू चाहे कोई मुझे जंगली कहे’, ‘गोविंदा आला रे आला जरा’, ‘आसमान पे आया फरिश्ता प्यार का सफर दिखला ने’, ‘बार बार देखो हजार बार देखो’, ‘जवानिया ये मस्त मस्त पिये’, ‘सवेरे वाली गाडी से’, ‘दिवाना मुझसा नही इस अंबर के नीचे’, ‘खुली पलक में झूठा गुस्सा बंद पलक में प्यार’, ‘अहसान तेरा होगा मुझपर’ , ‘नजर बचाके चले गये वो …’ किती म्हणून सांगावित? रफी-शम्मी हि जोडी सुपर हिट होती.
================================
हे देखील वाचा : Shammi Kapoor : शम्मी कपूर मधुबालावरील (एकतर्फी) प्रेमात अक्षरशः पागल झाला होता!
=================================

एका व्हिडिओ मॅक्झिनला दिलेल्या मुलाखतीत शम्मी कपूर यांनी रफी यांच्या निधनाची बातमी कळल्याचा एक भावस्पर्शी किस्सा सांगितला होता. त्या काळात शम्मी कपूर आपल्या गुरुच्या दर्शनासाठी वृंदावन ला गेले होते. दिवस होता १ ऑगस्ट १९८०. या दिवशी गुरुपौर्णिमा होती. शम्मी कपूर सकाळी स्नान पूजा करून रिक्षाने आपल्या गुरुकडे चालले होते. वाटेत त्यांना एक व्यक्ती भेटली त्यांनी रिक्षा थांबवून शम्मी कपूरला सांगितलं,” शम्मी जी आपकी आवाज चली गयी..” त्यावर शम्मी कपूर म्हणाले,” भैय्या सुभे सुभे आपने भांग पिली है क्या? मेरी आवाज तो सही सलामत है अच्छी है. कल रातभर भजन करता रहा और आज सुबह गुरु के दर्शन करने जा रहा हु और ये आप ऐसी अनाब शनाब बात क्यू कह रहे हो?” त्यावर ती व्यक्ती म्हणाली,” शम्मी जी मै आपकी आवाज नही बल्की आपकी परदे पर की आवाज के बारे में कह रहा हूं. रफी साहब नही रहे वो चले गये यही मै बता रहा था.” असं म्हणून त्याने तिथल्या लोकल पेपरचा अंक त्यांच्या हातात ठेवला.
================================
हे देखील वाचा : Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय का घेतला होता?
=================================
पहिल्या पानावरच रफीच्या निधनाची बातमी आली होती. 31 जुलै 1980 रात्री साडेदहा वाजता रफी यांचे देहावसंन झालं. बातमी पाहून शम्मी कपूर यांना भोवळ झाली ते रिक्षातून खाली उतरले आणि सरळ आपल्या हॉटेलमध्ये गेले. दिवसभर ते रडत होते. ते म्हणत होते,” वृंदावन मध्ये यमुना नदी आहे आणि दिवसभर माझ्या डोळ्यातून गंगा यमुना वाहत होत्या. रफीची एक एक आठवण एकेक गाणं माझ्या डोळ्यापुढे येत होतं. रफी शिवाय माझं आयुष्य म्हणजे शून्य आहे याची जाणीव मला होत होती. मला याचं आयुष्यभर दुःख राहिलं की रफीच्या अंत्यदर्शन मी घेऊ शकलो नाही.” या मुलाखतीत शम्मी कपूर पुढे असे म्हणतात की,” नंतर मी ज्या ज्या वेळेला माझ्या चित्रपटातील गाणी पाहायचो त्यावेळी लक्षात यायचं की चेहरा माझा आहे पण माझा आवाज रफीचा आहे वृंदावन मधील व्यक्ती खरंच सांगत होती! रफी शिवाय माझं रुपेरी आयुष्य शून्य आहे!”