Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

सुरु होतेय शर्वरी जोग आणि अभिजीत आमकर यांची नवी प्रेम कहाणी ‘तू ही रे माझा मितवा’…
प्रेम कुणाचे नाही कुणावर…प्रेम असे आभासच केवळ, प्रेम असावी एक कल्पना…प्रेम मनातील व्यर्थ भावना
सोडूनी अर्ध्यावर जाते कोणी कुणा…आठवांच्या उरती छळणाऱ्या खुणा , तरी ही चाहूल गोड़ कुणाची जिवाला ओढ लावी
का नाव कुणाचे घेता ही रात दरवळून यावी , ह्या मनात रुजलेला कोणाचा गोडवा…तू ही रे माझा मितवा…
लेखिका रोहिणी निनावे यांनी लिहिलेलं हे शीर्षकगीत अर्णव आणि ईश्वरीच्या प्रेमाची गोष्ट सांगून जातं. या दोघांची प्रेम कहाणी थोडी हटके आहे. एकमेकांच्या प्रेमात ते जितके बुडाले आहेत तितकेच ते एकमेकांचा तिरस्कारही करतात.(Tu Hi Re Majha Mitawa Marathi Serial)

म्हण्टलं तर एकमेकांशिवाय जगता येत नाही आणि म्हटलं तर एकमेकांसोबत रहाताही येत नाही. थोडक्यात प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव आणि ईश्वरीची हटके लव्हस्टोरी म्हणजे तू ही रे माझा मितवा ही मालिका. कुन्या राजाची गं तू रानी मालिकेतून घराघरात पोहोचलेली गुंजा म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजीत आमकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतील.

या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘तू ही रे माझा मितवा ही एक युवा प्रेम कहाणी आहे. या मालिकेतून परस्पर नाते संबंध उलगडतीलच पण या दोन प्रमुख पात्रांध्ये एक नवी केमिस्ट्री पाहायला मिळेल. प्रेम आहे पण व्यक्त होता येत नाही, राग आहे पण प्रेमामुळे रोखून ठेवलंय अशी ही दोन विरुद्ध माणसांची प्रेम कहाणी फुलत जाईल जी रसिकांना नक्की आवडेल.(Tu Hi Re Majha Mitawa Marathi Serial)
=================================
=================================
स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ता यांच्या टेल अ टेल मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या निर्मिती संस्थेने केली आहे. शैलेश शिर्सेकर या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका तू ही रे माझा मितवा २३ डिसेंबरपासून रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.