
Munjya 2 मधून शर्वरी वाघ हिचा पत्ता पट?
मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिवर्सने प्रेक्षकांना एकाहून एक दर्जेदार चित्रपट दिले आहेत… ‘स्त्री’ (Stree) पासून सुरु झालेला मॅडॉकचा प्रवास ‘थामा’ (Thama) पर्यंत येऊन ठेपला आहे… या दरम्यान, ‘भेडिया’, ‘स्त्री २’, ‘मुंज्या’ (Munjya) या चित्रपटांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे… ७ जुन २०२४ रोजी रिलीज झालेल्या मुंज्या चित्रपटाने नवा इतिहास रचला होता… आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या… आता लवकरच चित्रपटाचा दुसरा भाग महामुंज्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात शर्वरी वाघ दिसणार नाही अशी चर्चा रंगली आहे…

तर, मिळालेल्या माहितीनुसार, मुंज्या चित्रपटात शर्वरी वाघ हिने प्रमुख पात्र साकारलं होतं.. मात्र आता मुंज्या २ मध्ये एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार असं सांगितलं जात आहे… लापता लेडीज चित्रपटातून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रतिभा प्रेक्षकांना या चित्रपटात किती आवडेल हे आता येणारा काळच ठरवणार आहे… किंवा शर्वरी वाघ हिला चित्रपटात ठेवून अधिक रंजकता वाढवण्यासाठी आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री मेकर्सने केली आहे का अशी देखील चर्चा सुरु आहे…

तसेच, शर्वरी वाघ हिच्या अन्य चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तिची यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्समध्ये एन्ट्री होणार आहे… ‘अल्फा’ (Alpha) या चित्रपटात ती आलिया भट्ट (Alia Bhatt) हिच्यासोबत स्क्रिन शेअर करणार असून प्रेक्षक दोन अभिनेत्रींना Action मोडमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत…(Bollywood movies 2025)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi