
Don 3 : कियाराच्या जागी ही अभिनेत्री दिसणार?; संजय लीला भन्साळींना केलं आहे असिस्ट
एकामागून एक सेलिब्रिटी कपल प्रेगनन्सी जाहिर करत आहेत. याच यादीत काही दिवसांपूवी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी आई-बाबा होणार असं युनिक पद्धतीने जाहिर केलं होतं. आणि याच कारणामुळे बहुचर्चित ‘ड़ॉन ३’ चित्रपटातून कियाराने(Kiara Advani) मागार घेतली होती. आता तिच्या जागी दोन अभिनेत्रींच्या नावाची चर्चा असून त्यापैकी एक अभिनेत्री फायनल झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (Don 3 update)
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची घोषणा केली आहे. त्यामुळे कियारा ‘डॉन ३’ मधून बाहेर पडली आहे. तिच्या जागी कोण येणार, यावर सध्या चर्चा सुरू आहे. शर्वरी वाघ आणि क्रिती सेनॉनन यांची नावे पुढे येत आहेत. (Kriti Sanon)

शर्वरी वाघने ‘मुंज्या’ आणि ‘वेदा’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामुळेच तिचा विचार ‘ड़ॉन ३’ साठी केला जात असल्याचं म्हटलं जात आहे. (Sharvari wagh)

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या शर्वरी(Sharvari Wagh) आलिया भट्टसोबत ‘अल्फा’ (Alpha) चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. २०२५ च्या क्रिसमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असे सांगितले जात असून त्यानंतर ‘डॉन ३’ च्या शुटींगची शर्वरी सुरुवात करणार असंही म्हटलं जात आहे. तर, रणवीर सिंग सध्या आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandar) चित्रपटाच्या कामात व्यस्त असून फरहान अख्तरचा (Farhan Akhtar) ‘१२० बहाद्दर’ नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज होत आहे. (Bollywood upcoming movies)
===========
हे देखील वाचा : Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय
===========
‘डॉन’ फ्रँचायझीने १९७८ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने सुरुवात केली होती. नंतर फरहान अख्तर दिग्दर्शित शाहरुख खानने ‘डॉन’ आणि ‘डॉन २’ मध्ये मुख्य भूमिका साकारली. आता ‘डॉन ३’ मध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार असून लवकरच त्याच्या विरुद्ध कोणती अभिनेत्री असेल हे जाहिर केलं जाईल.