Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

शिवजयंती निमित्त ‘शेर शिवराज’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; २२ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस

 शिवजयंती निमित्त ‘शेर शिवराज’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; २२ एप्रिलला प्रेक्षकांच्या  भेटीस
Press Release

शिवजयंती निमित्त ‘शेर शिवराज’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; २२ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस

by Kalakruti Bureau 21/03/2022

आजवर शिवचरित्र अभ्यासकांनी, इतिहासकारांनी आपापल्या परीनं शिवचरित्राचं यथार्थ वर्णन केलं आहे. अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडेही अभिमानानं गायले आहेत. शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ या शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो. आता हाच ऐतिहासिक सुवर्णअध्याय २२ एप्रिलला रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होत आहे. नुकतीच या चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आणि पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

त्या काळी विजापूरच्या दरबारात ‘मै लाऊंगा शिवाजी को…! जिंदा या मुर्दा!’, अशी वल्गना करत अफझलखानाने शिवरायांना जिवंत वा मृत घेऊन येण्याचा विडा उचलला होता. निर्माते नितीन केणी, प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे आणि चिन्मय मांडलेकर यांच्या साथीनं लेखक, दिग्दर्शक, निर्माता दिग्पाल लांजेकर यांनी अफझलखान वधाचा चित्तथरारक अनुभव ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आणण्याचा विडा उचलला आहे.‘पावनखिंड’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर ‘शेर शिवराज’ चित्रपटाचं काम अंतिम टप्प्यात असून, येत्या २२ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेअंतर्गत ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शेर शिवराज’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला? हे पहायला मिळणार आहे. प्रतापगड आणि अफझलखान यांचा खूप जवळचा संबंध आहे. राजांना जेरबंद करण्याच्या उद्देशानं भला मोठा फौजफाटा घेऊन सर्व तयारीनिशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला खरा, पण पुन्हा माघारी जाऊ शकला नाही. तिथेच त्याची कबर खोदली गेली. कारण खानाला शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची यासोबतच संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जराही कल्पना नव्हती. शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन ‘शेर शिवराज’ या चित्रपटात घडणार आहे. यासोबतच त्या काळातील सामाजिक, राजकीय वातावरण, राजांच्या अचूक निर्णयांचा रयतेला होणारा फायदा, शत्रूंची आक्रमणं परतवून लावण्याची शक्ती, अफझलखानाची स्वारी, खानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं यथोचित चित्रण ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) मध्ये दिग्पालनं केलं आहे. याची झलक नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या ‘शेर शिवराज’च्या पोस्टर व टीझरवर ही पहायला मिळते. प्रतापगडावर डौलानं फडकणारा हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा, महाराजांचा रक्तानं माखलेला हात, खानाचा कोथळा काढणारी वाघनखं आणि त्या काळापासून आजच्या युगापर्यंत घडणाऱ्या सर्व घटनांचा मूक साक्षीदार असणाऱ्या तळपत्या सूर्याचं दर्शन पोस्टरवर घडतं आणि टीझरमधूनही तो थरार आपल्याला पहायला मिळतोय.

‘शेर शिवराज’ चित्रपटाची निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणी, राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल नारायणराव वरखडे, तसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांनी केली आहे.

====

हे ही वाचा: खुशखबर, नाटकं बहरली! आता हवी फक्त माध्यमांची साथ

====

याविषयी बोलताना मुंबई मुवी स्टुडियोजचे निर्माते नितीन केणी सांगतात, ‘गेली २ वर्ष चित्रपटगृहांपासून प्रेक्षक दूर राहिलाय व त्यानंतर आलेल्या ‘पावनखिंड’ चित्रपटाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. आणि आता २२ एप्रिलला प्रदर्शित होणारा ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी होईल, यात आम्हाला शंका वाटत नाही’. राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर म्हणाले, “आजची पिढी डिजिटल आहे. इतिहासाच्या अभ्यासासाठी संदर्भ ग्रंथ, बखरी, पुस्तके यांची नितांत आवश्यकता आहेच पण त्याची आवड निर्माण होण्यासाठी चित्रपटाइतके दुसरे प्रभावी माध्यम नाही त्यामुळे ‘शेर शिवराज’ सारख्या चित्रपटांची आजच्या पिढीला गरज आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Celebrity Entertainment marathimovie Sher Shivraj
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.