Junaid Khan आमिर खानच्या मुलाला ‘लाल सिंग चड्ढा’, ‘लापता लेडीज’साठी
Purva Kaushik ‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकने शेअर केला फॅन्सच्या प्रेमाचा खास व्हिडिओ
आता कलाकार म्हटले की, त्यांना फॅन्स असतात. प्रत्येक कलाकाराला कमी अधिक प्रमाणात फॅन्स असतातच. कलाकार देखील अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्या फॅन्सचे विविध किस्से सांगताना दिसतात. फॅन्स देखील आपल्या आवडत्या कलाकारांसाठी आपले प्रेम अनेकदा व्यक्त करताना दिसतात. (Marathi Entertainment News)
सोशल मीडियावर आपल्या आवडत्या कलाकारासाठी पोस्ट शेअर करतात, त्यांना विविध गिफ्ट्स पाठवतात, काही तर आवडत्या कलाकारांच्या नावाचे टॅटू देखील बनवतात. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात अनेक फॅन्सच्या खास आठवणी देखील कायम स्मरणात राहतात. हे फॅन्सच असतात जे कलाकारांना खऱ्या अर्थाने प्रसिद्ध करतात. आणि प्रेम देतात. कलाकारांच्या कामाची पोचपावती म्हणजेच फॅन्सचे प्रेम असते. (Marathi Tv News)
असाच एक फॅनचा खास अनुभव आला आहे, अभिनेत्री पूर्वा कौशिकला (Purva Kaushik). शिवा (Shivaa) या मालिकेतून प्रसिद्ध आणि लोकप्रिय झालेली पूर्वा सध्या खूपच चर्चेत आली आहे. पूर्वाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक खूपच सुंदर आणि लक्षवेधी व्हिडिओ शेअर केला आहे. पूर्वाने या व्हिडिओमध्ये तिला भेटायला आलेल्या एका फॅनला दाखवले आहे. सोबतच या फॅनमुळे आणि त्यांच्या प्रेमामुळे पूर्वा भावुक झाल्याचे देखील दिसत आहे. (Purva Kaushik)
पूर्वाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या मालिकेच्या सेटवर असून, शिवाच्या गेटअपमध्ये दिसत आहे. सोबतच तिच्याबरोबर तिची एक चाहती दिसत आहे. व्हिडीओमध्ये पूर्वा म्हणते, “आज आमच्या ‘शिवा’च्या सेटवर एक गोड व्यक्ती आली आहे. ती शिवाची चाहती आहे. तिचे नाव वृषाली आहे. तिला शिवा खूप आवडते, असे ती सांगत आहे. आणि ती उत्तम गाणं गाते. (Purva Kaushik News)
यानंतर पूर्वा तिला विचारते, “आज तू कोणते गाणं गाणार आहेस? या प्रश्नावर वृषाली म्हणते, आज मी, ‘आपकी नजरों ने समजा’ हे गाणं गाणार आहे. यानंतर वृषालीने तिच्या सुंदर आणि गोड आवाजात ‘आप की नजरों ने समजा’ हे गाणे गायले. हा व्हिडीओ स्टोरीवर शेअर करताना पूर्वाने कॅप्शनमध्ये लिहिले, “आज शिवाच्या सेटवर मी या खूप क्यूट चाहतीला भेटली. तिची भेट मनाला स्पर्शून गेली. शिवा आज खऱ्या अर्थाने जिंकली, असं वाटले. मी भारावून गेले आहे.” (Shiva Fame Purva Kaushik)
=================
हे देखील वाचा : A. R. Rahman वाढदिवस स्पेशल: भारतीय संगीताचा ‘राजा’ – ए आर रहमान
=================
सध्या पूर्वाचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल होताना दिसत आहे. पूर्वाला आलेल्या या फॅनच्या सुंदर अनुभवाबद्दल तिच्या सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. दरम्यान पूर्वाबद्दल सांगायचे झाले तर, पूर्वा कौशिक ही मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Entertainment mix masala)
सध्या पूर्वा ‘शिवा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत असली तरी याआधी तिने अनेक मालिकांमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तिने आतापर्यंत लक्ष्य, अजूनही बरसात आहे, भाग्य दिले तू मला, अस्मिता, फ्रेशर्स आदी अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे.