छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या Akshay Kumar याच्या ‘त्या’ चित्रपटाचं

आधी फ्लॉप नंतर ब्लॉकबस्टर Sholay बद्दल असं का झालं?
१५ ऑगस्ट १९७५… एकीकडे भारत स्वातंत्र्य दिन साजरा करतोय…आणि त्या दिवशीच प्रदर्शित होतो एक ग्रेट सिनेमा, ज्यामध्ये आजवर न पाहिलेली सिनेमॅटोग्राफी, आजवर न पाहिलेला action मोड, आजवर न पाहिलेले इमोशनल सिन्स… आणि खलनायकाच्या भूमिकेत एक आगळावेगळा चेहरा… पण या सगळ्या गोष्टी असूनही, हा सिनेमा बघायला थिएटरमध्ये कोणीच येत नव्हतं… हो, ‘शोले’ जो आज भारतातला सर्वात ग्रेट मुव्ही मानला जातो, तो सुरुवातीला लोकांनी नाकारला होता.पण ह्याचं नेमकं कारण तुम्हाला माहित आहे का ? आणि असं काय घडलं होतं की काही आठवड्यांतच हा चित्रपट all time ब्लॉकबस्टर ठरला ? चला तर जाणून घेऊयात…

शोलेचे पहिले काही आठवडे बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे थंड गेले. कारण ‘शोले’ प्रदर्शित झाला, तेव्हा हा चित्रपट काहीसा गोंधळात सापडला होता. शोलेचे रायटर सलीम जावेद यांना तर ‘शोले’ कडून खूप अपेक्षा होती. कारण रमेश सिप्पी यांचा दिग्दर्शनातला अनुभव, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्रसारखे दमदार अभिनेते, संजीव कुमारसारखा तोडीचा कलाकार, अमजद खानसारखा नवखा खलनायक… आणि स्वतः सलिम-जावेद यांची स्टोरी आणि डायलॉग्स.. त्यामुळे हे सगळं पाहता ‘शोले’ एक मास्टरपीस ठरणार, अशी हवा आधीच तयार झाली होती. मात्र, चित्रपट रिलीज झाल्यावर पहिल्या काही आठवड्यातील प्रतिक्रिया मिक्स आल्या होत्या. काहींना चित्रपटाची स्लो पेस, त्यातला violence आणि काहीसा वेगळा असलेला टोन समजला नाही. शिवाय काही सिने एक्स्पर्ट आणि क्रिटीक्सनी यावर अशीही टीका केली की “ही एक वेस्टर्न फिल्मची नक्कल आहे,” एवढचं नाही तर काही ठिकाणी थिएटरमधले शो काढून टाकण्याची देखील वेळ आली.
चित्रपटाचा मूळ शेवट संजीव कुमार (ठाकूर) गब्बरला ठार मारतो असा होता. पण सेन्सॉर बोर्डाने त्यावर आक्षेप घेतला, त्यामुळे ह्या चित्रपटाचा शेवट देखील बदलण्यात आला, परंतु ही गोष्टही काही प्रेक्षकांना खटकली. इतक्या भव्य निर्मितीनंतर,अपेक्षित असं भावनिक शिखर गाठण्यात चित्रपट अपयशी ठरत असल्याचंही मत पसरलं. त्यामुळे हे सगळं पाहता, ‘शोले’ सुरुवातीला ‘फ्लॉप’ झाला. एका magazine ने तर छापलं होतं की शोले हा वाईट चित्रपट आहे. यासोबतच एका मोठ्या स्टारकास्ट समोर नवीन कोणतातरी विलन आणून उभा केलाय, प्रेक्षक याचा स्वीकार करूच शकत नाहीत…

सलीम जावेदचा हा चित्रपट १००% नाहीच चालणार. दुसरीकडे रमेश सिप्पी यांनी climax बदलून रीशूट करण्याचाही plan केला होता. त्यात थिएटरमध्ये गर्दी देखील कमी होत होती. मात्र, चित्रपटाची खरी ताकद म्हणजे त्याची पटकथा, पात्रांची मांडणी आणि संवाद. “कितने आदमी थे?”, “अरे ओ सांभा!”, “बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना” हे सगळे संवाद लोकांच्या मनात घर करू लागले. त्यातच रमेश सिप्पी यांनी या चित्रपटाची सर्व गाणी रिलीज केली. सर्वच गाणी लोकांच्या पसंतीस पडली आणि पुन्हा प्रेक्षक थियेटर्सकडे वळायला लागला. सिनेमाच्या फ्रेम्स, आणि गब्बरसिंगसारखा विलन हळूहळू ‘कल्ट फिगर’ होऊ लागला. एका आठवड्याने जिथे चित्रपटाच्या प्रदर्शनाला कोणी फारसं महत्त्व दिलं नव्हतं, तिथे आता थिएटरबाहेर रांगा लागायला लागल्या. ‘शोले’चं खरं यश म्हणजे त्याने वेळ घेऊन पण प्रेक्षकांशी नातं जोडून त्यांचं मन जिंकलं.

‘शोले’ हा भारतातील पहिला असा मोठा आणि Stereophonic Sound असलेला चित्रपट होता. ही तांत्रिक बाब त्या काळातील एक मोठं पाऊल होतं. थरारक अॅक्शन सीन, जबरदस्त सिनेमॅटोग्राफी, आणि उत्कृष्ट पार्श्वसंगीत यामुळे चित्रपटाने एक नवा दर्जा सेट केला. त्यातील प्रत्येक पात्र अगदी कालांतराने ‘आयकॉनिक’ ठरलं. जय-वीरूची मैत्री , बसंतीची हलकीफुलकी शैली, ठाकूरचं आगळं वेगळं दुःख, आणि अर्थातच गब्बरची निर्दयपणा चं प्रतीक बनलेली व्यक्तिरेखा ! गब्बरचं रानटी कॅरेक्टर आणि ह्या सगळ्यामुळे प्रेक्षकांनी ‘शोले’ला जे स्वीकारलं, त्यानंतर त्याचं यश थांबलंच नाही.
================================
हे देखील वाचा: Yere Yere Paisa 3 : मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात पुन्हा ‘खळ्ळ खट्याक’?,
=================================
मुंबईच्या मिनर्व्हा थिएटरमध्ये सलग ५ वर्षे हा चित्रपट हाऊसफुल्ल चालला. ‘शोले’ने बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आणि भारतीय सिनेमाचा चेहरामोहराच बदलून टाकला. हा चित्रपट आजही ‘कल्ट क्लासिक’ म्हणून ओळखला जातो. आजही ‘शोले’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर एक अनुभव आहे – एक आठवण, एक संस्कृती, आणि एक काळ. गब्बरचं भीषण हास्य, जय-वीरूची दोस्ती, बसंतीची बडबड आणि ठाकूरचं मूक दुःख या सगळ्या गोष्टी आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. एका ‘फ्लॉप’ ठरलेल्या सुरुवातीच्या चित्रपटाने अखेर भारतीय चित्रपटसृष्टीचा ‘एवरेस्ट चढला… आणि आजपर्यंत कोणीही तो विझवू शकला नाही.आज ५० वर्ष झाली तरी शोले लोकांच्या मनात जिवंत आहे. त्यातील गाणी, dailogues आजही लोक तितक्याच उत्साहात ऐकतात,पाहतात. तुम्हाला आवडलेलं शोलेतलं आवडतं गाणं आणि favourite dilogue कोणता आहे ? हे आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi