
Sholay चित्रपट ओरिजनल क्लायमॅक्ससह १५०० स्क्रिन्सवर झळकणार!
भारतीय चित्रपटसृष्टीतील कल्ट क्लासिक चित्रपट ‘शोले’ (Sholay) रिलीज होऊन यावर्षी ५० वर्ष पुर्ण झाली… अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर असणारा हा ‘शोले’ चित्रपट आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे… विशेष म्हणजे रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ ओरिजनल क्लायमॅक्ससह लवकरच रि-रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या रि- रिलीजवर हेरिटेज फाउंडेशन या कंपनीने काम केलं असून 4K मध्ये तयार केले असून ‘शोले द फायनल कट’ असं या चित्रपटाला नाव दिलं आहे. (Sholay-The Final Cut)

मिळालेल्या माहितीनुसार, ‘शोले द फायनल कट’ हा चित्रपट १२ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे… देशातील तब्बल १५०० स्क्रीनवर शोले रि-रिलीज करण्यात येणार आहे… आज ५० वर्ष उलटून गेली तरीही शोले तितकाच ताजातवाणा वाटतो आणि चित्रपटाच्या कथेची आणि विशेष: क्लायमॅक्सची वारंवार चर्चा होते… असं सांगितलं जातं की शोल चित्रपटाचा खरा शेवट वेगळा होता… आणि आता प्रेक्षकांना ‘शोले द फायनल कट’च्या निमित्ताने ओरिजनल क्लायमॅक्स पाहता येणार आहे. (Sholay movie re-release)

फिल्म हेरिटेज फाउंडेशनने ‘शोले’ चे 4K रिस्टोअरिंग पूर्ण केलं आहे… मूळ क्लायमॅक्समध्ये, ठाकूर गब्बर सिंगला पायांनी चिरडून मारतो. मात्र तेव्हा सेन्सॉर बोर्डाने रिलीज होण्यापूर्वी क्लायमॅक्समध्ये बदल केला… आता रिलीजच्या ५० वर्षांनंतर मूळ क्लायमॅक्ससह चित्रपट प्रदर्शित करणे ही टीमसाठी एक उल्लेखनीय कामगिरी आहे. १९७५ पासून आपली चर्चा कधीच बंद पडू न देणाऱ्या ‘शोले’ चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, अमजद खान, संजीव कुमार अशा बऱ्याच कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या….(Entertainment News)
================================
Sholay हीट झाला आणि इंडस्ट्रीच बदलली…
================================
शोले हा चित्रपट बऱ्याच कारणांमुळे महत्वाचा आहे… शोले चित्रपट पाहात त्यातील प्रत्येक डायलॉग तोंडपाठ करत पिढ्या न् पिढ्या घडल्या…. थिएटर्समध्ये १५-२० वेळा तरी ‘शोले’ पाहणारा प्रेक्षकवर्ग आजही आहे.. शोले पाहिला नाही असा भारतातला माणूस सापडणं फारच क्वचित आहे… १५ ऑगस्ट १९७५ रोजी रिलीज झालेल्या ‘शोले’चं नाणं ५० वर्षांनीही खणखणीत वाजतंय हे अभिमानास्पद नक्कीच आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi