Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी पहिल्यांदाच ‘छावा’ (Chhaava) हा ऐतिहासिक चित्रपट साकारला आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर बॉलिवूडमधून समोर आल्यामुळे ग्लोबली या चित्रपटाला अधिक यश मिळाले. छावाच्या यशानंतर आता लवकरच लक्ष्मण उतेकर मराठी मनोरंजनविश्वातील एका प्रभावी व्यक्तीचा जीवनपट समोर आणणार असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे यात प्रमुख भूमिकेत अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) असणार असंही म्हटलं जात आहे.(Bollywood news)

श्रद्धा कपूर हिची आई आणि मावशी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे (Padmini Kaolhapure) असल्यामुळे लहानपणापासूनच श्रद्धा मराठमोळ्या वातावरणात मोठी झाली आहे. बऱ्याचदा पॅप्स सोबतही श्रद्धा मराठीतच संवाद साधताना दिसते. इतकंच नाही तर मराठमोळे खाद्यपदार्थ देखील तिला फार आवडत असल्याचं तिने मुलाखतींमध्ये सांगितलं असून काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या Waves Summit 2025 मध्ये इन्स्टाग्रामच्या हेटला श्रद्धाने आपली पारंपारिक पुरणपोळी खाऊ घातली होती. आता लवकरच तिच्या अभिनयातूनही एक मराठमोळपण मोठ्या पडद्यावर येणार असून लक्ष्मण उतेकरांच्या आगामी चित्रपटात ती लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Entertainment)
सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक आणि बायपोकिसचा ट्रेण्ड असल्यामुळे लक्ष्मण उतेकर प्रत्येक ट्रेण्डमधील एक चित्रपट साकारण्याचा प्रयत्न करत आहेत असं दिसून येतं. इतकंच नाही तर बॉलिवूडमधून मराठी कलाकारांचं किंवा इतिहासातील मराठमोळ्या प्रभावी व्यक्तींचं जीवन प्रेक्षकांसमोर आणण्याचा त्यांचा विचार दिसून येतो. यामुळेच तमाशा आणि लावणी क्षेत्रात प्रभावी क्रांती घडवून आणणाऱ्या विठाबाई यांचं जीवन चित्रपटातून लोकांसमोर आणण्याचा उतेकरांचा विचार असल्याची चर्चा सध्या सिनेवर्तृळात रंगली आहे. (Biopics in Bollywood)

‘विठाबाई’ या एक लोकप्रिय कलाकार होत्या. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, सामाजिक दबाव आणि तरीही आपली कला जीवापाड जपण्याची जिद्द हे सर्वकाही त्यांच्या चरित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न लक्ष्मण उतेकर करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाची कथा प्रामुख्याने १९५० ते १९८० दरम्यानच्या काळावर आधारित असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विठाबाई यांनी तमाशा आणि लावणी क्षेत्रात केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातही क्रांती घडवून आणण्याचा आणि की लोककला प्रेक्षकांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केला. विठाबाईंना ‘प्रभाकर’, ‘कलागौरव’ यांसारखे अनेक पुरस्कारही प्रदान करण्यात आले होते. २००२ साली त्यांचं निधन झालं. आजही विठाबाईंचं समाज कार्य, लावणीसाठी केलेले योगदान आणि एक आदर्श महिला कलाकार म्हणून त्यांची ओळख आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
================================
हे देखील वाचा: Indian Cinema : ‘गुड्डी’ ते ‘जब वी मेट’ ; बॉलिवूडच्या चित्रपटांचे साऊथ रिमेक्स!
=================================
श्रद्धा कपूर हिने आजवर विविधांगी भूमिका साकारल्या. बॉलिवूडच्या पहिल्या हॉरर-कॉमेडी विश्वात तिने तिच्या अभिनयाने स्थान निर्माण केलं. अद्याप या चित्रपटाबद्दल अधिकृत माहिती जरी आली नसली तरी सूत्रांच्या माहितीनुसार, श्रद्धा सध्या लावणीचं प्रशिक्षण घेत असून व्हॉईस मॉड्यूलेशनवरही मॅडॉक फिल्म्सच्या स्टुडिओमध्ये काम करत आहे. बायोपिक्सच्या या ट्रेण्डमध्ये महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्रातील कला यांनाही स्थान दिले जात असेल तर ही अभिमानाचीच गोष्ट आहे. शिवाय, श्रद्धा कपूर हिच्या अभिनय कारकिर्दितील ही भूमिका Life Changing नक्कीच ठरेल यात शंका नाही.(Horror comedy movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi