Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

मराठी नाटक पाहून भारावली Tabu, कलाकारांचं केलं तोंडभरून कौतुक!

Karishma Kapoor ने ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षितसोबत

Aranya Movie Teaser: हार्दिक जोशीच्या ‘अरण्य’ सिनेमाचा दमदार टीझर रिलीज प्रदर्शित

Bigg Boss 19: सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ चे घर

Dastak : राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा मदनमोहन यांचा चित्रपट

Dada Kondke : “मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन…”

Vidya Balan नाही तर ‘या’ अभिनेत्री असत्या ‘परिणीता’मधील लोलिता!

Rajinikanth  आणि मिथुन चक्रवर्ती ३० वर्षांनी पुन्हा एकत्र दिसणार?

Kareena Kapoor : ‘जब वी मेट’ चित्रपटात ‘गीत’च्या भूमिकेत लागलेली

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Shreyas Talpade मराठीसोबत हिंदी चित्रपट गाजवणारे मराठमोळे नाव श्रेयस तळपदे

 Shreyas Talpade मराठीसोबत हिंदी चित्रपट गाजवणारे मराठमोळे नाव श्रेयस तळपदे
कलाकृती विशेष

Shreyas Talpade मराठीसोबत हिंदी चित्रपट गाजवणारे मराठमोळे नाव श्रेयस तळपदे

by Jyotsna Kulkarni 27/01/2025

मराठी इंडस्ट्रीमधले असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील नावलौकिक मिळवले. असेच एक नाव म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade). श्रेयस मराठीसोबतच बॉलिवूडमधील एक लोकप्रिय आणि मोठे नाव आहे. त्याने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर या सिनेविश्वात आपली मोठी ओळख तयार केली आहे. एक उत्तम अभिनेता असलेला श्रेयस हा यशस्वी निर्माता आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट (Voice Over Artist) देखील आहे. तो नेहमीच विविध कारणांमुळे प्रकाशझोतात येत असतो. (Shreyas Talpade)

आज २७ जानेवारी रोजी श्रेयस तळपदे त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्या काळात श्रेयस तळपदे हा मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. आज त्याच्याकडे नाव, पैसा, प्रसिद्धी सर्वच आहे. मात्र त्याचा हा अभिनय प्रवास अजिबातच सोपा नव्हता. हे सर्व मिळवण्यासाठी श्रेयसने खूपच मेहनत घेतली. त्यानंतर त्याने यशाला गवसणी घातली. आज श्रेयसच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या संपूर्ण अभिनय प्रवासाबद्दल. (Shreyas Talpade Birthday)

Shreyas Talpade

श्रेयस तळपदे यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी मालिका आणि स्टेज शोमधून केली होती. त्याच्या आत्या अभिनेत्री मीना टी आणि जयश्री टी या मनोरंजविश्वातील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. मात्र तरीही त्याला संघर्ष करावा लागला. श्रेयसचा आधीपासूनच अभिनयाकडे कल होता. त्याने खूपच कमी वयात अभिनीत करियर करण्याचे ठरवले होते. (Ankahi Baatein)

श्रेयसचा जन्म २७ जानेवारी १९७६ रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. त्याने त्याचे शिक्षण मुंबईतच पूर्ण केले. तो मुंबईतल्या मिठीबाई कॉलेजमध्ये होता. कॉलेजमध्ये असतानाच त्याने नाटकांत काम करायला सुरूवात केली. पुढे हळूहळू तो मालिकांकडे वळला. त्याने सुरुवातीच्या काळात अनेक गाजलेल्या हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या. (Entertainment mix masala)

मराठी मनोरंजविश्वात श्रेयस त्याचे पाय भक्कम रोवत होता. मराठीमध्ये तो लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाला आणि मग त्याने त्याचा मोर्चा हिंदी चित्रपटांकडे वळवला. २००५ साली श्रेयसने नागेश कुकुनूर यांच्या ‘इकबाल‘ (Iqbal) या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात त्याने अतिशय गरीब असलेल्या मूक बधिर क्रिकेटरची भूमिका साकारली होती. इकबाल सिनेमा हिट झाला आणि श्रेयसच्या भूमिकेचे आणि अभिनयाचे समीक्षकांसह प्रेक्षकांनी देखील भरभरून कौतुक केले.

Shreyas Talpade

‘इकबाल’ सिनेमाने श्रेयससाठी हिंदी सिनेसृष्टीची दार उघडली गेली. यानंतर तो २००७ साली फराह खानच्या ‘ओम शांती ओम’ (Om Shanti Om) सिनेमात शाहरुख खानच्या मित्राच्या ‘पप्पू’च्या भूमिकेत दिसला. या सिनेमाने त्याला अफाट लोकप्रियता आणि अधिक मोठी ओळख मिळवून दिली. त्यानंतर तो अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसला. ताईने रोहित शेट्टीच्या गाजलेल्या ‘गोलमाल’ सिरीजमध्ये देखील काम केले आहे.

एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता की, एक काळ असा होता जेव्हा श्रेयस तळपदेकडे बसचे भाडे देण्यासाठी किंवा सँडविच घेण्यासाठीही पैसे नव्हते. मात्र केवळ स्वतःचावर विश्वास ठेऊन आणि अजोड मेहनत करून आज श्रेयस तळपदे यशस्वी झाला. श्रेयसने एका मुलाखतीमध्ये करण जोहर आणि यशराज प्रोडक्शनबद्दल एक वक्तव्य केले होते. ज्यामुळे तो कमालीचा गाजला.

श्रेयसने मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “घराणेशाही आणि पक्षपात नेहमीच सगळीकडे असतो. ,तर आपल्याला कायम पुढे जाताना, याचाच विचार करत बसणे योग्य ठरत नाही. यावर लक्ष देण्यापेक्षा पुढे जाणे आवश्यक आहे. मी कधीही करण जोहर किंवा यशराजचा चित्रपट केला नाही. शिवाय मी कधीही त्यांच्याशी चित्रपटांसाठी संपर्क देखील साधला नाही आणि त्यांनी सुद्धा माझ्यासोबत काम करण्यास इच्छा दाखवली नाही. पण याचा अर्थ असा नाही की माझी कारकीर्द संपली किंवा वाया गेली.”

Shreyas Talpade

दरम्यान ‘इकबाल’, ‘वेलकम टू सज्जनपूर’, ‘आशायें’, ‘गोलमाल सिरीज’ आणि इतर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तो दिसला आहे. मराठीमध्ये श्रेयस पछाडलेला, सावरखेड- एक गाव, सनई चौघडे, पोस्टर बॉईज, बाजी या चित्रपटांमध्ये दिसला होता. अभिनयाव्यतिरिक्त, श्रेयस एक उत्तम आणि प्रसिद्ध व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहे. त्याने द लायन किंग आणि पुष्पा यांसारख्या सिनेमांना आपला आवज दिला आहे.

=========

हे देखील वाचा : Ashok Saraf पद्मश्री अशोक सराफ यांची कारकीर्द

Milind Gawali अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’ जाहीर झाल्यानंतर मिलिंद गवळी यांनी शेअर केली खास पोस्ट

=========

श्रेयासाठी २०२३ हे साल खूपच आव्हानात्मक ठरले होते. कारण त्याला त्यावर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. यावर देखील श्रेयसने मात केली आणि तो कामावर परतला. श्रेयस मोठ्या संपत्तीचा मालक असून, त्याचाकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. कधी काली जेवणासाठी देखील पैसे नसलेला श्रेयस आज एका सिनेमासाठी ३/४ कोटी रुपये घेतो. श्रेयस तळपदे हा केवळ अभिनेताच नाही तर प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. तो एक बिझनेसमॅनही आहे. श्रेयस तळपदे हा ओटीटी प्लॅटफॉर्मचा मालकही आहे. 2021 मध्ये त्याने ‘Nine Rasa’ नावाचे ओटीटी प्लॅटफॉर्म तयार केले.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood bollywood update Celebrity Celebrity News Featured happy birthday Shreyas Talpade hindi marathi Marathi Movie producer Shreyas Talpade Shreyas Talpade Shreyas Talpade Birthday श्रेयस तळपदे श्रेयस तळपदे अभिनय प्रवास श्रेयस तळपदे माहिती श्रेयस तळपदे वाढदिवस
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.