‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Shubha Khote : “इंडस्ट्रीत इतकी वर्ष काम करुनही माझं खरं नाव…”; ज्येष्ठ अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
मराठी-हिंदी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते विजू खोटे (Viju Khote) आणि त्यांची बहिण शुभांगी खोटे यांनी आजवर अजरामर भूमिका साकारल्या आहेत… ब्लॅक एण्डय व्हाईट ते रंगीत चित्रपटांचा प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी खोटे (Shubhangi Khote) यांनी नुकत्याच एका मुलाखतीत गेल्या अनेक वर्षांपासूनची खंत बोलून दाखवली… आजही इंडस्ट्रीत इतकी वर्ष काम करुनही लोकांना माझं खरं नाव माहित नाही हे फार वाईट वाटतं असं त्या म्हणाल्या आहेत…

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत शुभांगी खोटे यांनी आपल्या खऱ्या नावाबद्दल खुलासा केला आहे… त्या म्हणाल्या की, “माझं नाव ‘शुभांगी खोटे’ असं आहे… घरी मला ‘शुभा’ म्हणतात. पण एवढी वर्ष मी काम करूनही लोकांना माझं नाव माहिती नाही म्हणजे काय?… याचा मला राग येतो म्हणजे मला कधी फोन जर आला ना की ‘शोभा खोटे आहेत का?’ तर मी त्यांना सरळ ‘wrong number’ असंच सांगते….”(Marathi Entertainment News)
================================
हे देखील वाचा : सचिन, विजू खोटे ते एम.एस. शिंदे; Sholay चं मराठी कनेक्शन!
================================
दरम्यान, शुभांगी खोटे यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर आजवर त्यांनी ‘सीमा’, ‘पेईंग गेस्ट’, ‘बेटी बेटे’, ‘मिली’, ‘पॉकेट मार’, ‘घराना’, ‘पुकार’, ‘आखिर क्यु’, ‘माझा पती करोडपती’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘मे प्रेम की दिवानी हु’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत… (Shubhangi Khote movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi