Aatali Batami Phutli Trailer: धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

Shubhvivah मालिकेतील अभिनेत्रीने लग्नाच्या तब्बल १० वर्षांनंतर दिली गुड न्यूज !
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘शुभविवाह’. या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र आपुलकीनं स्वीकारलं गेलं असून, त्यातील ‘पूर्णिमा’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री कुंजिका काळविंट प्रेक्षकांची लाडकी ठरली आहे. सध्या हीच कुंजिका काळविंट आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एका अतिशय सुंदर टप्प्याचा अनुभव घेत आहे. कारण, कुंजिका लवकरच आई होणार असून, तिच्या या आनंदाच्या बातमीमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण पसरलं आहे.(Shubhvivah Marathi Serial)

कुंजिकाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या खास सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. पारंपरिक पद्धतीनं सजवलेल्या या समारंभात कुंजिकाने हिरव्या रंगाची नेत्रदीपक नऊवारी साडी नेसली होती. पारंपरिक दागिने आणि देखणी साडी यामुळे तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं. तिच्या शेजारी तिचा नवरा निखिल काळविंटही होता. दोघांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान स्पष्ट जाणवत होतं. या सोहळ्यातील प्रत्येक क्षणानं त्यांच्या चाहत्यांनाही भावुक केलं आहे.

विशेष म्हणजे, कुंजिका आणि निखिल यांच्या लग्नाला तब्बल दहा वर्षं पूर्ण झाली आहेत. इतक्या वर्षांनंतर त्यांनी आई-बाबा होण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचा आनंद शब्दांत मावणार नाही. त्यांच्या आयुष्यात आता एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार असून, या नव्या प्रवासासाठी त्यांचे चाहते आणि सहकलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.(Shubhvivah Marathi Serial)
===============================
===============================
कुंजिका काळविंट ही केवळ एक अभिनेत्री नसून सोशल मीडियावरही खूप सक्रिय असणारी व्यक्तिमत्त्व आहे. ती आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच संपर्कात राहते. सेटवरील मजेदार क्षण, रिहर्सल्समधील गंमती-जमती, तसेच सहकलाकारांसोबत बनवलेल्या मजेदार रील्स ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. यामुळे तिचे चाहते तिच्या वैयक्तिक आयुष्याशीही जोडले गेले आहेत. त्यामुळेच तिच्या मातृत्वाच्या या नव्या टप्प्याबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. शुभविवाह’ मालिकेमध्ये ‘पूर्णिमा’ या भूमिकेतून तिनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील तिचं काम आणि तिच्या अभिनयाने ती घराघरात पोहोचली आहे. आता मात्र तिच्या खासगी आयुष्यातील या गोड बातमीमुळे चाहत्यांनी तिला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.