Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

नरजेत दरारा आणि चेहऱ्यावर क्रुरता; Siddharth Jadhav चा नवा लूक पाहिलात का?
सध्या सगळीकडे महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे… छत्रपती शिवाजी महाराज आताच्या काळात पुन्हा एकदा आले तर त्यांचा दृष्टीकोन काय असेल? आणि ते या सगळ्यातून लोकांना कसा मार्ग दाखवतील असं कथानक या चित्रपटातून लोकांना पाहायला मिळणार आहे… त्यामुळे चित्रपटाबद्दल आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये कुतूहल असताना आता सिद्धार्थ जाधव याचा या चित्रपटातील भन्नाट लूक प्रेक्षकांसमोर रिलीज करण्यात आला आहे… चेहऱ्यावरील रक्त, व्रण, उरात धडकी भरवणारी नजर आणि त्या नजरेत दडलेलं क्रोर्य असं आक्राळ विक्राळ रूप असलेला सिद्धार्थ जाधव या पोस्टरमध्ये दिसत आहे. (Siddharth Jadhav Movies)

दरम्यान, २००९ मध्ये आलेल्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय!’ या चित्रपटात सिद्धार्थ जाधवने उस्मान पारकर ही भूमिका साकारली होती… आणि आता ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटात तो हटके भूमिकेत दिसणार आहे.. आपल्या भूमिकेबद्दल सिद्धार्थ जाधव म्हणतो, ”या भूमिकेबद्दल सांगायचं तर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटातील माझी ही भूमिका माझ्या आजवरच्या कारकिर्दीमधली सगळ्यात वेगळी आहे. या पात्रामध्ये जी क्रुरता आहे ती त्याच्या लूकमध्ये उतरणं खूप गरजेची होती. जेव्हा हा लूक माझ्याकडे आला, तेव्हा मी स्वतःच थक्क झालो. मी असाही दिसू शकतो? असा प्रश्न मला पडला. अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वी कधीच साकारली नाही. परंतु माझा महेश सरांवर पूर्ण विश्वास असल्याने मी सुद्धा या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्यातरी मी भूमिकेविषयी जास्त काही बोलू शकत नाही, परंतु मला खात्री आहे की, प्रेक्षकांना माझं हे रूप नक्कीच आवडेल.”
================================
हे देखील वाचा : Asrani यांच्या पार्थिवावर तातडीने अंत्यसंस्कार का केले?
================================
द ग्रेट मराठा एन्टरटेनमेंट, सत्य-सई फिल्म्स आणि क्रिझोल्हची निर्मिती असलेला हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून येत्या ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून या चित्रपटात विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने ,नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ जाधव हे मातब्बर कलाकार बघायला मिळणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi