
Siddharth Malhotra-Kiara Advani यांना झालं कन्यारत्न; सिद्धार्थने पोस्ट करत दिली आनंदाजी बातमी!
हिंदी चित्रपटसृष्टीतून एक आनंदाची बातमी आली आहे… सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी आई-बाबा झाले आहेत. १५ जुलै २०२५ रोजी कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून सिनेविश्वातून त्यांच्यावप शुभेच्छांचा वर्षाव होत आहे… सिनेसृष्टीतील आणखी एका कपलला मुलगी झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही विशेष आनंद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कियारा अडवाणी (Kiara Advani) हिने एच. एन. रिलायन्स रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला. बाळ आणि कियारा यांची प्रकृती उत्तम असून सिद्धार्थने स्वत: पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “आम्ही प्रचंड आनंदी आहोत…आमचं जग आता पूर्णपणे बदलून गेलंय. आम्हाला मुलगी झालीये.”
===========
हे देखील वाचा : Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय
===========
दरम्यान, २८ फेब्रुवारी २०२४ मध्ये सिड-कियाराने सोशल मिडियावर पोस्ट करत आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली होती… त्यांनी हातात लहान बाळाचे मोजे धरुन फोटो शेअर केला होता… ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट. लवकरच येत आहे”. शिवाय, ‘स्टुडअंट ऑफ द इयर’ (Student Of The Year Movie) चित्रपटातील कलाकार आलिया भट्ट आणि वरुण धवन यांनाही मुलीच असल्यामुळे सिद्धार्थने त्यांची टीम जॉईन केली आहे अशी नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे…
================================
हे देखील वाचा : Don 3 : कियाराच्या जागी ही अभिनेत्री दिसणार?; संजय लीला भन्साळींना केलं आहे असिस्ट
=================================
कियारा अडवाणी हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती ह्रतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यासोबत वॉर २ मध्ये झळकणार आहे… त्याशिवाय, फरहान अख्तर दिग्दर्शित डॉन ३ मध्ये ती रणवीर सिंग सोबत दिसणार होती… मात्र, गरोदरपणामुळे तिने तो चित्रपट सोडला होता.. आता कियाराच्या जागी डॉन ३ मध्ये क्रिती सेनॉन दिसेल असा अंदाज वर्तवला जात आहे..
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi