Singham Again Exclusive: अजय देवगणच्या चित्रपटाचा क्लायमॅक्स रिलीज होण्याआधीच लीक?
या वर्षी अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट सिंघम अगेन प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण आणि रोहित शेट्टी बऱ्याच काळापासून या चित्रपटात काम करत आहेत. ‘सिंघम अगेन‘ यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अशातच अजय देवगणच्या सिनेमाचा क्लायमॅक्स सीन रिलीज होण्याआधीच लीक झाला आहे. सिंघम अगेनच्या क्लायमॅक्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात अजय देवगणची सिंघम स्टाईल पाहायला मिळत आहे. रोहित शेट्टीचा हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पण गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाशी संबंधित एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.(Singham Again Exclusive)
जॅकी श्रॉफ आणि अजय देवगण यांच्यातील फाइट सीनची ही व्हिडिओ क्लिप शेअर करणाऱ्यांचा दावा आहे की, हा रोहित शेट्टीच्या चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन आहे, ज्यात अजय देवगण जॅकीला पकडून कुठेतरी घेऊन जाताना दिसत आहे.सिंघम अगेनच्या शूटिंगशी संबंधित व्हिडिओ एका सोशल मीडिया युजरने एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात अजय देवगण ब्लॅक कमांडोसोबत सिंघम लुकमध्ये दिसत आहे. हा सीन सिंघम अगेनचा क्लायमॅक्स सीन असल्याचा दावा सोशल मीडिया युजरने केला आहे. सिंघम अगेनबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, परंतु निर्मात्यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे.
आता स्वत: रोहित शेट्टीने यावर प्रतिक्रीया दिली आहे तो म्हणतो की, ”या बातमीत काहीही तथ्य नाही आणि सिंघम अगेनचा एक सीन लीक झाल्याचा दावा करणारी व्हिडिओ क्लिप जे शेअर करत आहेत, ते पूर्णपणे खोटे आहे. त्यामुळे चित्रपटाच्या सेटवरील कोणतीही क्लिप आणि तीही क्लायमॅक्ससारख्या महत्त्वाच्या सीक्वेंसचा व्हिडिओ व्हायरल होणे अशक्य आहे. हा निव्वळ वेडेपणा आहे.” मात्र ही क्लिप कोणत्या सीनची आहे याबाबत रोहित शेट्टीकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.(Singham Again Exclusive)
============================
============================
खरं तर चित्रपटाशी संबंधित कोणत्याही कर्मचाऱ्याला शूटिंगच्या वेळी सेटवर मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नाही. चित्रपटात रस्त्यावर चाललेल भांडण आपण पाहत असलो तरी या रस्त्याचा सेटही फिल्म स्टुडिओच्या आतच बांधलेला असतो आणि म्हणूनच दिग्दर्शक आणि प्रॉडक्शनच्या परवानगीशिवाय सेटवर कॅमेरा क्रूशिवाय इतर कुणालाही फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्याची परवानगी नसते.