Kiara Advani : प्रेग्नेंसीनंतर कियारानं ‘या’ चित्रपटातून घेतली माघार

Sthal Movie Review : अरेंज मॅरेजची वैचारिक गोष्ट!
लग्न… काळ बदलत गेला तसं लग्नसंस्थेच्या परिभाषाही बदलल्या. पुर्वीच्या काळी घरातील मोठी मंडळी त्यातही पुरुष मंडळी जो मुलगा पसंत करेल त्याची लग्न करायचं आणि संसार करायचा. पण काळानुरुप आणि शिक्षणामुळे स्त्रियांनी त्यांचे हक्क आणि वैचारिक स्वातंत्र्य याचं महत्व समजलं आणि अरेंज मॅरेज जरी असलं तरी आपला जोडीदार कसा हवा? याबद्दलच्या अपेक्षा त्या मांडू लागल्या आणि स्वत:ही आलेल्या स्थळावर पारखू लागल्या. अरेंज मॅरेजमध्ये जसं मुलगा मुलीला पाहायला घरी येतो त्याऐवजी मुलगी मुलाला पाहायला जाऊन तिने त्याची वर परीक्षा घेतली तर? ऐकायला छान वाटतं पण हे शक्य आहे?
असो… तर आणखी काळ पुढे गेला आणि लव्ह मॅरेज हे फारच कॉमन झालं. वयाची तिशी आली तरी घरी जर का लग्न न झालेली मुलगी घरात असेल तर तुझा तु शोध ग बाई पोरगा आणि पिवळे करुन टाक हात हे संवाद घरोघरी ऐकू येतात. अजून काळ पुढे गेला आणि लिव्ह इन रिलेशनशिप ही नवी संकल्पना पाश्चिमात्य देशांकडून आपल्या भारतात, संस्कृतीत हळूहळू का होईना रुजू लागली.(Sthal Movie review)

मात्र, आजही पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागातील मुली शिक्षण जरी घेत असल्या तरी त्यांना त्यांच्या आदीनुसार लग्न करण्याची किंवा कोणत्या मुलाशी बोलण्याची परवानगी देखील नसते. शिवाय १८ वर्ष पुर्ण झालेल्या मुलीचं चांगलं स्थळ बघून कधी लग्न लावतोय असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं. अशाच एका पश्चिम महाराष्ट्रातल्या गावातील एका महत्वाकांक्षी मुलीच्या स्थळाची गोष्ट ‘स्थळ’ या चित्रपटातून मांडली आहे. जाणून घेऊयात कसा आहे चित्रपट…. (Marathi film reviews)
‘स्थळ’ या चित्रपटाची कथा कापसाची शेती करणाऱ्या एका शेतकरी कुटुंबाभोवती आणि त्यांच्या घरातील सविता हिच्या लग्नासाठी चांगलं स्थळ भेटावं याभोवती फिरते. सविताला मुळात इतक्या लवकर लग्न करायचं नसतं. तिला MPSC ची परीक्षा देण्याची इच्छा असते. पण आई-वडिलांच्या इच्छेसाठी एखामागून एक येणारी स्थळं ती पाहात असते. प्रत्येकाकाडून येणारा नकार तिच्यासाठी नवीन नसतो पण त्यामुळे तिच्या करिअरवर होणार आघात नव्याने तिला दु:ख देणारा असतो. गावातील तिच्याच मैत्रीणींची एकामागून एक होणारी थाटामाटातील लग्न पाहून सविताच्या आई-वडिलांवर त्याचा काय परिणाम होतो, समाजात लग्न न जमणाऱ्या मुलीकडे आणि तिच्या कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा बदलतो यावर चित्रप भाष्य करत पश्चिम महाराष्ट्रातील कापूस व्यवसायावरही एक कटाक्ष टाकतो. (Marathi upcoming movies)
============
हे देखील वाचा :Madhuri Dixit-Nene : सुपरस्टार असूनही माधुरीला का मिळायचा आईचा ओरडा?
============
‘स्थळ’ (Sthal Movie review) या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटात केवळ ग्रामीण भाग, गावातील लोकांचे दैंनंदिन जीवन, शहरात कितीही प्रगती होत असली तरी आपल्या संस्कृतीशी, मातीशी त्यांचं जोडलेलं नातंआदही कसं आहे यावरच फोकस करुन प्रेक्षकांना खिळवून ठेवतं.चित्रपटाच्या नावाप्रमाणे गावात आजही अरेंज मॅरेजसाठी स्थळ घेऊन येणारी पुरुष मंडळी, त्यांचा मुलीच्या घरातील वावर, मानसिकता या सगळ्यांवर अगदी बारकाईने लिखाण करत सादरीकरण केलं आहे. स्थळ या चित्रपटाचे दिग्दर्शक जयंत सोमलकर यांच्याच गावातील घरी या चित्रपटाचं शुटींग झालं असून गावातील सर्वसामान्य माणसाचं त्यातही एका शेतकऱ्याचं घर कसं असेल ते अगदी तंतोतंत दाखवलं आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील लोकांची बोलीभाषा, काही टिपिकल शब्द प्रेक्षकांना गावात घेऊन जातात. (Entertainment tadaka)

लग्न हा शब्द उच्चारला की मुलीच्या मनातील घालमेल, घरातील इतर स्त्रियांची मानसिकता, बरीच स्थळं बघूनही न येणार होकार समाजात त्या कुटुंबाला कोणत्या नजरेने पाहतो? किंवा गावातून शहरात शिक्षणासाठी जाणऱ्या मुलींचं शिक्षकांकडे होणार आकर्षण अशा अनेक बारीक सारीक गोष्टींवर अगदी विचार करुन त्याचं सादरीकरण करण्यात आलंय. एकीकडे लग्न हा मोठा तेढा सोडवत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला किंवा कापसाला न मिळणारा योग्य भाव आत्महत्या करण्यास कसा प्रवृत्त करतो यावरही हा चित्रपट पॅरलली भाष्य करतो. (Entertainment masala)
===============================
हे देखील वाचा : Priyanka Chopra : मिस वर्ल्ड जिंकण्यासाठीच ‘ती’ आली होती!
===============================
कितीही म्हटलं की स्त्रियांना स्वातंत्र्य आहे, त्यांना त्यांचं जीवन त्यांच्य अटीशर्थींनी जगण्याचा अधिकार आहे पण वास्तविक जीवनात पाहता आजही ग्रामीण भागातील स्त्री पुरुषांच्या वैचारिक, आर्थिक, मानसिक वर्चस्वाखाली गुदमरत आहे. स्थळ हा चित्रपट केवळ स्त्री सशक्तीकरण व्हावं किंवा त्यांना त्यांचं स्वातंत्र्य मिळावं यावरच केवळ लक्ष केंद्रित करत नसून त्यापलीकडे गावातील मुलांची बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, हुंडा यावरही प्रकाश टाकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटसृष्टीचं नाव उंचावणाऱ्या स्थळ चित्रपटात एकही स्टार कलाकार नाहीये. चित्रपटाची कथाच सुपरस्टार असून ७ मार्च २०२५ पासून प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट नक्की पाहा…. (Sthal movie review)
‘कलाकृती मिडीया’ स्थळ चित्रपटाला देत आहे 3.5 स्टार!