Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

April May 99: बोमन इराणी यांच्या उपस्थितीत ‘एप्रिल मे ९९’ मधील ‘समर हॅालिडे’ गाणे लाँच…

 April May 99: बोमन इराणी यांच्या उपस्थितीत ‘एप्रिल मे ९९’ मधील ‘समर हॅालिडे’ गाणे लाँच…
April May 99 Movie Song
मिक्स मसाला

April May 99: बोमन इराणी यांच्या उपस्थितीत ‘एप्रिल मे ९९’ मधील ‘समर हॅालिडे’ गाणे लाँच…

by Team KalakrutiMedia 24/04/2025

April May 99: उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टालजिक सफर घडवणारा ‘एप्रिल मे ९९’ येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटातील उन्हाळ्याची सुट्टी अधिक रंगतदार करणारे ‘समर हॅालिडे’ गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हा चित्रपट ज्याप्रमाणे प्रेक्षकांना नोस्टालजिक करणार आहे, अगदी त्याला साजेसे असे या गाण्याचे लाँचिंग करण्यात आले. माटुंग्यातील रुईया महाविद्यालयाजवळील ‘डीपीज‘ या अतिशय प्रसिद्ध अशा ठिकाणी हा शानदार सोहळा संपन्न झाला. यावेळी आर्यन मेंगजी (कृष्णा), श्रेयस थोरात (प्रसाद), मंथन काणेकर (सिद्धेश) आणि साजिरी जोशी (जाई) यांनी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य सादर केले तर भूमी प्रधान, रोहन गोखले, रोहन प्रधान यांनी ‘समर हॉलिडे‘ हे गाणे गायले. यावेळी बोमन इराणी यांनी कलाकारांचे कौतुक करत संपूर्ण टीमसोबत मनमुराद गप्पा मारल्या. (April May 99 Movie Song)

April May 99 Movie Song
April May 99 Movie Song

एप्रिल मे ची सुट्टी प्रत्येकासाठीच खास असते. धमाल, मस्तीच्या याच काळात चित्रपटातील ‘ समर हॅालिडे’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. काही दिवसांपूर्वीच कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश यांच्या ग्रुपमध्ये जाईची एंट्री झाली असून त्यांची उन्हाळ्याची सुट्टी आता अधिकच मजेदार झाल्याचे दिसत आहे. या गाण्यात कृष्णा, प्रसाद, सिद्धेश आणि जाई समर हॉलिडेजची मजा लुटताना दिसत आहेत. हे गाणे भूमी प्रधान, रोहन गोखले, रोहन प्रधान यांनी गायले असून रोहन – रोहन यांचे संगीत लाभलेल्या हा धमाल गाण्याला प्रशांत मडपुवार, रोहन गोखले यांनी शब्दबद्ध केले आहे.

=============================

हे देखील वाचा: Atali Batami Fhutali: ‘मास्टर’ मोहन आगाशे आणि ‘ब्लास्टर’ सिद्धार्थ जाधव एकत्र येत चित्रपटात दिसणार वेगळ्या अंदाजात…

=============================
आपली आठवण शेअर करताना बोमन इराणी म्हणतात, “ राजेश आणि रोहनला मी खूप आधीपासून ओळखतो. दिग्दर्शक म्हणून रोहनचा हा पहिला चित्रपट आहे, त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी गाणे लाँच करून त्यांनी आमच्या मैत्रीच्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. गाणे खूपच सुरेख आहे. या चारही मुलांमधील आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी कमाल अभिनय केला आहे. या गाण्यातून मे महिन्यासातील सुट्टींचा खूप सुंदर काळ उभा करण्यात आला  असून ज्यावेळी इंटरनेट, मोबाईल नव्हते, तेव्हा उन्हाळ्याची सुट्टी अशीच एन्जॉय केली जायची. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा!”

April May 99 Movie Song
April May 99 Movie Song

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “ आमच्या या नॉस्टेलजियात बोमन सर सहभागी व्हावेत आणि त्यांचे आशीर्वाद मिळावेत, अशी आमची इच्छा होती. सहायक दिग्दर्शक म्हणून मी कामाला सुरुवात केली तो चित्रपट बोमन सरांचाच होता. त्यामुळे तेव्हापासून मी त्याचा प्रवास बघत आलो आहे. त्यांनी कायमच आम्हाला मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे या सगळ्या आठवणी खूप मौल्यवान आहेत. त्यामुळेच या छोटेखानी कार्यक्रमातून आम्ही पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.(April May 99 Movie Song)
=====================================

हे देखील वाचा: Gulkand Marathi Movie: प्रेमाच्या गुलकंदाची चव चाखवणारे ‘गुलकंद’चे शीर्षकगीत ‘प्रेमाचा गुलकंद’ प्रदर्शित…

=====================================

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: April May 99 April May 99 Movie Song Boman Irani Celebrity Entertainment Marathi Movie rohan mapuskar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.