‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Kantara 1ने बॉलिवूडच्या चित्रपटाला चारली धुळ; Sunny Sanskari Ki Tulsi Kumari ची कमाई झाली तरी किती?
बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड एकाच दिवशी २-३ चित्रपट रिलीज झाले की बॉक्स ऑफिसवर घमासान क्लॅश होणारच… आता ‘कांतारा:द लेजेंड-चॅप्टर १’ (Kantara : The Legend-Chapter 1) चित्रपटासमोर कुठला अन्य चित्रपट रिलीज होत असेल तर ते धाडसच म्हणावं लागेल… कारण आधीच २०२२ मध्ये आलेल्या ‘कांतारा’ चित्रपटाचा मोठा फॅनबेस होताच… आणि अशातच आता ‘कांतारा १’ ने तर धुमाकूळच घातला आहे… २ ऑक्टोबर २०२५ ला ‘कांतारा १’ चित्रपटासोबत ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा चित्रपट रिलीज झाला होता… सुरुवातीला हा चित्रपटही बॉक्स ऑफिस गाजवेल असं चित्र दिसत होतं… मात्र, आता ‘कांतारा १’ मुळे सगळी सुत्र बदलली आहेत… जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कमाईबद्दल… (Tollywood and Bollywood movies)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ (Sunny sanskari ki tusli kumari) या चित्रपटाने पहिव्या दिवशी ९.२५ कोटी कमवत ओपनिंग केली होती.. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ५.५ कोटी, तिसऱ्या दिवशी ७.५ कोटी, चौथ्या दिवशी ७.७५ कोटी, पाचव्या दिवशी ३.२५ कोटी, सहाव्या दिवशी ३ कोटी कमवत आत्तापर्यंत एकूण ३६.२५ कोटीच कमावले आहेत… काही रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचं बजेट ६० कोटी असून असून केवळ ६ दिवसांत बजेटच्या अर्धीच किंमत रिकव्हर झाली आहे… त्यामुळे आता बॉलिवूडचा आणखी एक चित्रपट कन्नड चित्रपटापुढे फिका पडला आहे…(Bollywood movie box office collection)
================================
हे देखील वाचा : Kantara चित्रपटातील ‘पंजुर्ली’ आणि ‘गुलिगा’ हे देव कोण आहेत?
=================================
‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खैतन यांचं असून चित्रपटात वरुण धवन (Varun Dhawan), जान्हवी कपूर, रोहित सराफ आणि सान्या मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत… दरम्यान, येत्या काळात वरुण धवनचा ‘बॉर्डर २’ (Border 2) चित्रपट येणार आहे. तर, जान्हवी कपूर Peddi या चित्रपटात दिसणार आहे… (Janhvi Kapoor movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi