‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Suraj Chavan Marriage: ठरलं! सूरज चव्हाणला भेटली त्याची ‘बच्चा’, कोकण हार्टेड गर्लने फोटो ही शेअर केला !
‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेता सुरज चव्हाणच्या (Suraj Chavan) लग्नाची चर्चा पुन्हा एकदा रंगत चालली आहे. यामागचं कारण म्हणजे ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता प्रभू-वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) हिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो. अंकिताने नुकतंच सुरजच्या गावी जाऊन त्याची भेट घेतली असून, या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एका तरुणीसोबतचा फोटोही पाहायला मिळतो, ज्यामध्ये तिने “सुरजला खूप खूप शुभेच्छा! लग्नाला येणं शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही भेट” असे कॅप्शन दिलं आहे. मात्र त्या तरुणीचा चेहरा इमोजीने झाकण्यात आला आहे. त्यामुळे फोटो शेअर करून सुरजचं लवकरच लग्न होणार असल्याचं संकेत तिने दिले असले, तरी लग्नाची तारीख किंवा ठिकाणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.(Suraj Chavan Marriage)

१९ सप्टेंबर रोजी सुरजने स्वतःच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो एका मिस्ट्री गर्लसोबत साउथ इंडियन पेहरावात दिसतो. या व्हिडीओमध्ये सुपरहिट सिनेमा ‘पुष्पा’मधील डायलॉग्सदेखील ऐकायला मिळतात. मात्र, त्या व्हिडीओमध्ये देखील सुरजने त्याच्या खऱ्या आयुष्यातील ‘श्रीवल्ली’चा चेहरा उघड केलेला नाही. त्यामुळे ती तरुणी कोण आहे, तिचं नाव काय आहे, ती काय करते, सुरज आणि तिची भेट कशी झाली? त्यांचं नातं कसं फुललं? या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘बिग बॉस’च्या घरामध्ये असताना सुरजने अनेकदा आपला प्रेमभंग, एकटेपणा, आणि भविष्याची जोडीदार कशी असावी हे स्पष्टपणे व्यक्त केलं होतं. त्याने सांगितलं होतं की, घराबाहेर पडल्यानंतर तो सर्व सदस्यांशी संपर्कात राहणार असून, आपल्या लग्नाला सगळ्यांना आमंत्रित करणार आहे. शिवाय, तो अत्यंत साध्या पद्धतीने, देवीमातेसमोर जोडीदाराच्या गळ्यात माळ घालून लग्न करणार असल्याची स्वप्नं त्याने उघडपणे बोलून दाखवली होती.(Suraj Chavan Marriage)
===============================
===============================
विशेष म्हणजे, एकटेपणाचा अनुभव घेतल्यानंतर सुरजने एका अनाथ मुलीशी लग्न करण्याचा विचार केल्याचंही त्याने यापूर्वी म्हटलं होतं. आता अंकिता प्रभू-वालावलकर हिने दिलेल्या संकेतांमुळे हे लग्न लवकरच होणार असल्याचं स्पष्ट होत असलं, तरी हा विवाहसोहळा नेमका कधी आणि कुठे होणार, याची उत्सुकता मात्र अजून कायम आहे. ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे सुरज चव्हाण घराघरात पोहोचला. या कार्यक्रमामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि त्याचं व्यक्तिमत्त्व अनेकांच्या मनात घर करून गेलं.