Govinda : “जेम्स कॅमरॉनच्या चित्रपटाला ‘अवतार’ नाव मीच दिलं”

Suyash Tilak : “कास्टिंग करताना फॉलोवर्स बघण्याचा पायंडा पडत असेल तर…”
मराठी चित्रपट असो किंवा मालिका सोशल मीडिया इनफ्ल्युएन्सर किंवा कंटेन्ट क्रिएटर यांना अभिनयाच्या या क्षेत्रात नव्या संधी दिल्या जात आहेत. याशिवाय, सोशल मिडियावर किती फॉलोवर्स आहेत यावरही अनेक कलाकारांचे अस्तित्व किंवा त्यांच्या परफॉर्मन्सची कुवत तपासली जात आहे; जे अतिशय चुकीचं आहे. मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) याने कास्टिंगबद्दल भयाण वास्तव सांगत असताना कास्टिंगचा नवा ट्रेंन्ड आता आल्याचं सांगितलं आहे. (Bollywood update)
झेन एंटरटेनमेंटला सुयशने (Suyash Tilak) नुकतीच मुलाखत दिली. यात त्याने फॉलोवर्स पाहून कास्टिंग करण्यावर मत मांडलं. तो म्हणाला, “कास्टिंग करताना फॉलोवर्स बघितले जातात. अनेकदा फोन येतात की तुमचं नाव शॉर्टलिस्ट झालंय तुमची सोशल मीडियाची लिंक पाठवा. तुमचे फॉलोवर्स किती आहेत, ते बघायचं आहे. समजा जर मला शून्य फॉलोवर्स असतील तर मग काय करणार? म्हणजे मग मी कलाकार नाहीये का? जर मला फॉलोवर्स आहेत तरच मला कलाकार म्हणून मान्यता आहे. हे जे समीकरण बनलंय ते खूप धोकादायक आहे. आणि असा पायंडा जर पडत असेल तर त्याने प्रॉब्लेम होऊ शकतो”. (Entertainment tadaka)

पुढे तो असं देखील म्हणाला की, “मालिकांच्या बाबतीतही हे मी बघितलं आहे. मालिकांच्या कास्टिंगच्या वेळी विशेषत: मुलींचं कास्टिंग करताना ज्यांचं फॅन फॉलोईंग चांगलं आहे किंवा ज्या मुली सोशल मिडियावर पॉप्युलर आहेत त्यांना प्राधान्य दिलं जातं. आणि मग त्या जेव्हा कॅमेरासमोर उभं राहतात तेव्हा १०-१५ टेक होतात. सगळे कलाकार, टेक्निशियन त्या शॉटसाठी थांबलेले असतात. मग महिनाभरानंतर त्यांना जाणवतं की आपण चूक केली आहे. मग तिथे नवीन चेहरा येतो”.(Marathi films update)
===============================
हे देखील वाचा : Priyanka Chopra : मिस वर्ल्ड जिंकण्यासाठीच ‘ती’ आली होती!
==============================
चित्रपट, नाटक, मालिकांमध्ये काम मिळावं यासाठी अॅक्टिंगचे कोर्स करुन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हौशी कलाकार आलेले असतात. मात्र, जर का सोशल मिडियावर फॉलोवर्स किती आहेत किंवा सोशल मिडियावर पॉप्युलॅरिटी किती आहे? यावरुन जर का चित्रपट, मालिका किंवा प्रोजेक्ट्समध्ये कास्टिंग होत असेल तर अभिनय क्षेत्र खरंच धोक्यात आले किंवा किती धोक्याची घंटा आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. (Casting news)