Tamannaah-Vijay : लग्नाच्या चर्चा सुरु असताना तमन्ना-विजयचं ब्रेकअप?

Tamannaah-Vijay : लग्नाच्या चर्चा सुरु असताना तमन्ना-विजयचं ब्रेकअप?
बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा याचं ब्रेकअप झाल्याचं समोर येत आहे. दोघांनी एकमेकांचे मित्र राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती इंडिया टु डे ने दिली आहे. गेल्या २ वर्षांपासून तमन्ना आणि विजय एकमेकांना डेट करत होते. त्यांनी २०२३ मध्ये एकमेकांसोबत रिलेशनमध्ये असल्याचं ऑफिशिअली जाहिर केलं होतं. अनेक कार्यक्रमांमध्ये दोघांनीही एकत्र पाहण्याची सवय असलेल्या चाहत्यांना लग्नाच्या चर्चा सुरु असताना तमन्ना-विजयचं ब्रेकअप धक्का लावणारं आहे.

इंडिया टु डे ने दिलेल्या माहितीनुसार, तमन्ना आणि विजय यांनी आपल्या ब्रेकअपवर कुठलीही प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय घेतला असून ते मैत्रीचं नातं जपणार आहेत. विजय आणि तमन्ना ‘लस्ट स्टोरीज २ दरम्यान भेटले होते. सहकलाकार म्हणून झालेली भेट प्रेमात रुपांतरित झाली आणि त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली.
बऱ्याचदा तमन्ना विजयची गर्लफ्रेंड आहे म्हणून त्याला ट्रोल देखील केलं गेलं होतं. मात्र, दोघांनी ट्रोलर्सकडे कायम दुर्लक्ष करत आपल्या रिलेशन आणि कामावर लक्ष केंद्रित केलं. सुरुवातीच्या काळात दोघांनी त्यांच्या नात्याबद्दलची प्रायवसी राखून ठेवली होती आणि अधिकृतपणे जाहिर केल्यानंतरही त्यांनी ते कायम ठेवलं होतं. त्यामुळे आता अचानक त्यांच्यात आलेला दुरावा त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच मोठा धक्का आहे.
============
हे देखील वाचा :Bollywood Celebs : गांधीजींनी वास्तव्य केलेल्या घरात राहतो अक्षय कुमार?
============
विजय वर्माच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास नुकताच तो IC 814 : The Kandahar Hijack, मटका किंग मध्ये झळकला होता. तर तमन्ना भाटिया लवकरच वेगवेगळ्या विषयांवर आधारित वेब सीरीजमध्ये दिसणार आहे.