Farah Khan बॉलिवूडमधील लोकप्रिय कोरिओग्राफर फराह खानचा संघर्षमयी प्रवास
Tejashree Pradhan तेजश्री प्रधानने सोडली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका
मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan). ब्युटी विथ ब्रेन असलेल्या तेजश्रीला कमालीचा फॅनबेस आहे. तिने तिच्या सर्वच प्रोजेक्टसमधून आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. तिचे दिसणे, तिचे हसणे, तिची स्टाईल एकूणच तिचे व्यक्तिमत्व पाहून कोणीही लगेच तिच्या प्रेमात पडेल. (Tejashree Pradhan)
आज तेजश्रीला मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान दिले जाते. तिने तिच्या प्रत्येक मालिकेतून एक वेगळीच भूमिका आपल्या समोर सादर केली. तेजश्रीचा अभिनय बघताना ती कुठेही आपल्याला कृत्रिम वाटत नाही. त्यामुळेच तिची लोकप्रियता अधिकाधिक आहे. तेजश्री नेहमीच सोशल मीडियावर तिचे विविध फोटोशॉटमधील फोटो शेअर करत असते. (Tejashree Pradhan News)
तिच्या अतिशय सुंदर फोटोंमुळे ती कमालीची चर्चेत येते. मात्र सध्या तेजश्री चर्चेत येण्याचे कारण खूपच वेगळे आहे. तेजश्री ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत ती एका मुलीची आई ‘मुक्ता‘ (Mukta) ही भूमिका साकारत आहे. कधीही आई न होणाऱ्या मुक्ताचे अतिशय भिन्न परंपरा आणि रूढी असलेल्या परिवारात एका घटस्फोटित आणि एका मुलीचे वडील असलेल्या सागरशी लग्न होते. (Entertainment mix masala)
A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan)
हे लग्न एक तडजोड असते. मात्र या लग्नानंतर ते दोघं, त्यांचे आयुष्य आणि त्यांची मुलगी या सगळे कसे बदलते आणि अशातच ते दोघं दोन टोकाचे असूनही कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात यावर ही मालिका आधारित आहे. ही मालिका आणि मालिकेतील सर्वच कलाकार खूपच गाजत आहे. मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यास यशस्वी देखील ठरली. मात्र आता याच मालिकेसंदर्भात आणि तेजश्री प्रधानबद्दल एक बातमी समोर येत आहे. (Social News)
तेजश्रीने लोकप्रिय ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सोडली आहे. अचानक तिने या मालिकेला रामराम केला आहे. या मालिकेत आता तेजश्रीच्या जागी दुसरी अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजश्रीने अचानक ही मालिका का सोडली, याबद्दल कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही. मात्र तिच्या फॅन्ससाठी ही बातमी म्हणजे एक धक्काच आहे. (Tejashree Pradhan Left Premachi Goshta)
तेजश्रीने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडण्याच्या चर्चेदरम्यानच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने तिचा साडीमधील एक सुंदर फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, “चिअर्स.. कधीकधी तुम्हाला बाहेर पडावे लागते. तुमचे महत्त्व जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्त्वाचा आदर करा. कारण ते इतर कोणीही तुमच्यासाठी करणार नाही.” तेजश्रीने या कॅप्शनसोबतच जे हॅशटॅग दिले आहे, ते देखील लक्ष वेधून घेत आहे. (Tejashree Pradhan Post)
या कॅप्शनला तेजश्रीने ‘तुम्ही ज्याचे पात्र आहात त्यापेक्षा कमी गोष्टींसाठी अजिबात तडजोड करू नका’, ‘तुम्ही महत्त्वाचे आहात’, ‘देवाकडे तुमच्यासाठी नेहमीच प्लॅन तयार असतो’, ‘हॅपी लाइफ’. (#donotsettleforlessthanyoudeserve #YouMatter #godalwayshasaplan #HappyLife) असे हॅशटॅग देखील दिले आहेत. (Marathi Entertainment News)
दरम्यान तेजश्रीच्या या निर्णयामुळे तिच्या फॅन्सला खूपच दुःख झाले आहे. तिच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिला मालिका न सोडण्याचे आवाहन केले आहे. सोबतच तिला मालिका सोडण्याचे कारण देखील विचारले आहे. शिवाय तिच्या या निर्णयामुळे प्रेक्षकांना दुःख झाल्याचे देखील कमेंट्समध्ये म्हटले आहे.
दरम्यान तेजश्रीच्या जागी प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताची भूमिका आता कोण करणार? अशा देखील चर्चा होताना दिसत आहे. मिळणाऱ्या माहितीनुसार मुक्ता ही भूमिका मराठी आणि हिंदी मालिकेत काम करणारी स्वरदा ठिगळे करणार असल्याचे बोलले जात आहे. (Swarda Thikgle)
=========
हे देखील वाचा : Sagarika Ghatge राजघराण्यात जन्म, राष्ट्रीय हॉकीपटू, क्रिकेटरशी लग्न असा आहे सागरिका घाटगेचा प्रवास
Actor Yash कन्नड मालिकांचा हिरो ते ग्लोबल स्टार; जाणून घ्या केजीएफ अभिनेता यशचा अभिनय प्रवास
=========
स्वरदाने ‘माझे मन तुझे झाले’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमध्ये काम केले असून, तिने हिंदीतील काही मालिकांमध्ये देखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ‘सावित्री देवी कॉलेज’ आणि ‘प्यार के पापड’ या मालिकांमध्ये ती दिसली होती.