Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Tejashree Pradhan चं सुबोध भावेसोबत टी.व्हीवर कमबॅक केल्यानंतर चाहत्यांना आणखी एक सरप्राईज!
सगळ्यांची लाडकी जान्हवी अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) सध्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतेय… ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवणाऱ्या तेजश्रीने काही महिन्यांपूर्वीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सोडली होती… मात्र, आता पुन्हा एकदा ती मालिकेकडे वळल्यामुळे प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे… मालिकेनंतर आता तेजश्रीने तिच्या चाहत्यांना आणखी एक गुड न्यूज दिली आहे… काय आहे जाणून घेऊयात…(Marathi Serials)

लवकरच, सुबोध भावे (Subodh Bhave) सोबत तेजश्री प्रधान झी मराठीवरील नव्या मालिकेत एकत्र दिसणार असं स्पष्ट झालं आहे… त्यासोबतच तेजश्री एका चित्रपटातही दिसणार आहे…सोशल मीडियावर तेजश्रीने मुव्ही क्लॅपसोबतचा फोटो शेअर करत आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.’मुजरा’ (Mujara Marathi movie) असं चित्रपटाचं नाव असून नुकतंच शुटींग पुर्ण झाल्याचं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे… ही पोस्ट शेअर करत तेजश्रीनं लिहिलं आहे की, ‘See You In Cinemas Soon’ . त्यामुळे आता तिच्या आगामी चित्रपटात तेजश्रीसोबत कोणता अभिनेता असणार आणि नेमकं कथानक मुजरा म्हटल्यावर तमाशापटावर असेल की ऐतिहासिक असेल अशी चर्चा सुरु झाली आहे…(Marathi films 2025-26)
================================
हे देखील वाचा: सुबोध भावेने सांगितला पहिल्या विमान प्रवासाचा धमाल किस्सा
=================================
दरम्यान, तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांनी २०२४ मध्ये आलेल्या हॅशटॅग तदैव लग्नम चित्रपटात एकत्र काम केलं होतं… आणि त्यानंतर दोघे एकत्र मालिकेत दिसणार असल्यामुळे प्रेक्षकांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे…(Bollywood News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi