Chhaava : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी झाले छावा सिनेमाचे शूटिंग

Unch Maza Zoka : “ऑडिशनवेळी स्क्रिप्ट हरवली आणि…”
‘उंच माझा झोका’ या मालिकेतील रमा अर्थात अभिनेत्री तेजश्री वालावलकर (Tejashree Walawalkar) हिच्यासोबत कलाकृती मिडियाने ‘ती सध्या काय करते?’ हा विशेष व्हिडिओ सेगमनेंटला केला. यावेळी झी मराठी वाहिनीवरील उंच माझा झोका या मालिकेत भूमिका कशी मिळाली आणि ऑडिशनला झालेला गोंधळ याबद्दल आठवणी सांगितला. जाणून घेऊयात…
तर, २०१२ साली झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेल्या ‘उंच माझा झोका’ (Unch Maza Zoka) या मालिकेत भूमिका कशी मिळाली त्याचा खास किस्सा सांगताना तेजश्री म्हणाली, “उंच माझा झोका या मालिकेपूर्वी मी एका मालिकेत काम करत होते आणि ती मालिका लीप घेणार होती. तर मला कुणीतरी सांगितलं की एका मालिकेसाठी ऑडिशन सुरु आहे तुम्ही जा. पण माझा मालिकेच्या शुटचा अनुभव फारसा चांगलं नव्हता. कारण मी तिसरी-चौथीमध्ये होते आणि खुप हेक्टिक स्केड्यूल सुरु होतं. त्यामुळे परत मी मालिका करणार नाही असं ठरवलं आणि आम्ही परत पुण्याला आलो. मग त्या म्हणजे उंच माझा झोकाच्या ऑडिशनसाठी मला अगदी प्रोडक्शनकडूनही फोन आला; मग आई म्हणाली की आता गेलं पाहिजे”. (Unch Maza Zoka)

पुढे रमाबाईंशी आणखी एक विशेष नातं सांगताना तेजश्री म्हणाली, “ऑडिशनला गेले तिथे स्क्रिप्ट हातात आलेले पाहून मी टेन्शनमध्येच आले. कारण, मी जरी मराठी माध्यमात शिकत असले तरी भाषा फार अवघड होती. पण मला ती संपूर्ण पाठ झाली जी आजही मी म्हणू शकते. त्यानंतर मला लूक टेस्टसाठी बोलावलं. आणि चॅनलला अर्जंट व्हिडिओ पाठवायचा होता पण माझी स्क्रिप्ट हरवली. पण मला (Tejashree Walawalkar) संवाद तोंडपाठ असल्यामुळे वन टेकमध्ये मी ते ऑडिशन परत दिलं आणि त्याचवेळी मी रमाबाई रानडेंशी कनेक्ट झाले. नंतर मला असं समजलं की माझ्या आईचे आजोबा रमाबाई रानडेंच्या सेवासदन शाळेचे मुख्याध्यापक होते आणि त्यांची इच्छा होती की आपल्या घरात कुणीतरी रमाबाई घडावी. ‘उंच माझा झोका’ या मालिकेच्या निमित्ताने ती इच्छा पुर्ण झाली आणि अखेर मला आणि सगळ्यांना रमा भेटली”. (Marathi classic serials)
============
हे देखील वाचा :Tejashree Walawalkar : “…आणि माझ्यासाठी खास ‘ती’ भूमिका लिहिली गेली”
============
तेजश्री वालावलकर हिने आत्तापर्यंत ‘मात’, ‘चिंतामणी’, ‘बायोस्कोप’’, ‘सबका मालिक एक’, ‘महिमा अन्नपुर्णा देवीचा’, ‘राम राम महाराष्ट्र’ अशा अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तसेच, लवकरच ती नव्या कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचंही तिने सांगितलं. (Entertainment trending news)