Mandakini : नेपोटिझमच्या शर्यतीत मंदाकिनीच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या…

Tejashree Pradhan पहिल्याच सिनेमातील किसिंग सीनमुळे गाजली होती तेजश्री प्रधान
मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan). मालिका, चित्रपट आणि नाटक अशा मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी तेजश्री सध्या खूपच चर्चेत आहे. खासकरून मालिका विश्वामध्ये आपला तेजश्रीने आपली विशेष ओळख तयार केली आहे. ‘होणार सून मी या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’ , ‘प्रेमाची गोष्ट’ तिच्या या तिन्ही मालिका कमालीच्या सुपरहिट झाल्या. (Tejashree Pradhan)
तेजश्रीची ‘प्रेमाची गोष्ट‘ मालिकेतील भूमिका खूपच गाजत होती, मालिका देखील खूपच हिट होत होती. अशातच तिने अचानक ही मालिका सोडली आणि तिच्या फॅन्सला मोठा धक्का बसला. तेजश्रीने मालिका का सोडली याबद्दल खरे कारण कोणालाच माहीत मात्र तिच्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. याचा परिणाम मालिकेवरही झाला असून, मालिकेची लोकप्रियता देखील थोडी कमी झाल्याचे दिसत आहे. (Tejashree Pradhan News)

तेजश्रीने मालिका सोडली आणि ती चर्चेत आली. मात्र अनेकदा तेजश्री विविध कारणांमुळे चर्चेत येत असते. कधी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गाजते तर कधी तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे. मराठी, गुजराती आणि हिंदी भाषांमध्ये देखील काम केलेल्या तेजश्रीला तिच्या पहिल्याच बॉलिवूड सिनेमातून कमालीची प्रकाशझोतात आली होती. कारण तेजश्रीने तिच्या पहिल्याच सिनेमात काम करताना किसिंग सीन दिला होता. तिच्या या सिनेमापेक्षा जास्त या सीनचीच जास्त चर्चा झाली होती. (Entertainment mix masala)
तेजश्रीने २०२१ साली शर्मन जोशीसोबत (Sharman Joshi) ‘बबलू बॅचलर‘ (Babloo Bachelor) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अतिशय साधी आणि आकर्षक प्रेमकथा असलेल्या या सिनेमात तिने स्वाती ही भूमिका साकारली होती. याचा सिनेमात तिने शर्मन जोशीसोबत किसिंग सीन दिला होता. या सीनमुळे तिला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केले तर अनेकांनी तिच्या या सिंचे आणि कामाचे कौतुक देखील केले होते. मात्र दुर्दैवाने हा सिनेमा अपेक्षेप्रमाणे चालला नाही. प्रेक्षकांच्या अल्प प्रतिसादामुळे सिनेमा सुपरफ्लॉप झाला.
==============
हे देखील वाचा: Hemant Dhome: तू Superstar आहेस आणि कायम राहणार! हेमंत ढोमेने केले ‘या’ अभिनेत्याचे भरभरून कौतुक
Gurucharan Singh कर्जात बुडालेल्या ‘तारक मेहता’ फेम गुरुचरण सिंगला कामाची गरज
==============
तेजश्रीचा कमालीचा मोठा फॅन बेस आहे. तिने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर मालिकेला प्रेक्षकांनी देखील प्रेम देणे कमी केले आहे. याचा परिणाम त्या मालिकेच्या टीआरपी वर देखील झाला आहे. अनेकांनी तर तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर ही मालिका बघणेच बंद केले. सोशल मीडियावर देखील सतत पोस्ट कमेंट्स, मेसेज करत प्रेक्षक आणि फॅन्स तेजश्रीला मालिकेत पुन्हा आणण्याची विनंती करताना दिसत आहे. (Latest Marathi News)
दरम्यान तेजश्रीने प्रेमाची गोष्ट मालिका सोडली त्यांनंतर ती सतत फिरताना दिसत असून, ती तिच्या मित्र परिवारासोबत घरच्यांसोबत वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वीच ती श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात बंगलोरला गेली होती. तिथले अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.