Aamhi Saare Khavayye चं दमदार कमबॅक; ‘जोडीचा मामला’ सह होणार आंबट-गोड खुलासा !

Telugu Film Industry मधील कामगारांचा संप; टॉलिवूड इंडस्ट्री कशामुळे अडकली गोत्यात?
सध्या तेलुगू चित्रपटसृष्टी संकटात सापडली आहे… कर्मचाऱ्यांनी संपची हाक पुकारली असून बऱ्याच मोठ्या चित्रपटांच्या शुटींगवर त्याचा परिणाम झाला आहे… कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ न झाल्यानं शूटिंगचं काम थांबलं असून सिने कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्णय घेतला आहे.
तेलुगू फिल्म एम्प्लॉईज फेडरेशनने टॉलिवुडमधील कर्मचाऱ्यांच्या दररोजच्या वेतनात ३०% वाढ करण्याची मागणी केली असून गेल्या ३ वर्षांपासून वेतनात वाढ न झाल्यामुळे दहा हजारांपेक्षा अधिक कामगारांच्या रोजगारावर त्याचा वाईट परिणाम झाला असल्याचं फेडरेशनचं म्हणणं आहे. दरम्यान, यापूर्वी फेडरेशन आणि तेलगू फिल्म प्रोड्यूसर्स काउन्सिल आणि फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यात कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीबाबत अनेक वेळा चर्चा झाली असूनही काही तोडगा न निघाल्यामुले कामगारांनी संप करण्याचं पाऊल उचललं आहे… (Tollywood News)

मिळालेल्या माहितीनुसार, तेलुगू इंडस्ट्रीतील रोजंदारी मजुरांना रोज १४०० रुपये मिळत अशून यात ३०% वाढ झाल्यास कामगारांना १८२० रुपये दररोज मिळावे अशी अपेक्षा आहे… इंडस्ट्रीत दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, स्टंटमॅन त्यांचं मानधन स्वतः ठरवतात, मात्र, रोजंदारी मजुरांना फार त्रास सहन करावा लागतो. निर्माते तंत्रज्ञ आणि स्टार्सवर कोट्यवधी रुपये खर्च करतात, पण मजुरांच्या वेतनात वाढ करण्यास टाळाटाळ करतात अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे… (Entertainment News)
================================
=================================
दरम्यान, निर्मात्यांनी फेडरेशनची ३०% वाढीची मागणी नाकारून केवळ ५% वाढ देण्याचं ठरवलं, ही मागणी फेडरेशनने त्वरित नाकारली आहे. फेडरेशनने केलेल्या मागण्या जोवर पुर्ण होत नाहीत तोवर चित्रपटांचं शुटींग सुरु होणार नाही असा पवित्रा कामगारांनी घेतला असून आता पुढे काय होणार याकडे तेलुगू कलाकारांसहित सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे…या संपामुळे अनेक मोठे चित्रपट आणि वेब सिरीजच्या शूटिंगचं काम मध्येच थांबलं आहे संपामुळे तेलगू इंडस्ट्रीत मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi