‘तेंडल्या’ चित्रपटाच्या टीमकडून सचिन तेंडुलकरला अनोखी मानवंदना
क्रिकेटचा देव अस म्हंटल की अगदी लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यांपुढे क्रिकेटर सचिन तेंडुलकर उभा राहतो. नुकताच म्हणजेच २४ एप्रिल सचिन तेंडुलकरचा जन्मदिवस या दिवशी त्याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याचे चाहते दरवर्षी आपापल्या पद्धतीने त्याचा वाढदिवस साजरा करत असतात. तसेच यंदा सचिनचा ५० वा वाढदिवस सांगलीच्या शिराळा तालुक्यातील औंढी गावातल्या ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने साजरा करत सचिनला भन्नाट मानवंदना दिली आहे. सचिनच्या वाढदिवसाचा अक्षरशः उत्सव करत या मंडळींनी सचिनवरचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. प्रत्येक घराच्या दारात रांगोळी, दरवाज्यावर बॅटच्या गुढी आणि विशेष म्हणजे ढोलताशांच्या गजरात सचिन तेंडुलकरचा मोठा कटआऊट तयार करून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली आणि त्याला चक्क वडापावचा नैवेद्य सुद्धा दाखवण्यात आला होता.(Tendlya Marathi movie)
सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिन त्याचे वडील रमेश तेंडुलकर ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली. १९८८/ १९८९ साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे २३२ दिवस होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारातो सर्वांत तरुण खेळाडू होता.
क्रिकेटवेड्या सचिनने प्रत्येकाला स्वप्न बघायला शिकवले. स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवलं.त्याच्या शिकवणीने प्रेरित होऊन त्याच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या काही चाहत्यांनी आपला स्वप्नांचा प्रवास पूर्ण केला आहे.विशेष म्हणजे त्यांच्या या स्वप्नांचा प्रवास त्यांनी सचिनला ‘तेंडल्या’ हा मराठी चित्रपट भेट देऊन पूर्ण केला आहे. ज्या गावात ही कथा घडली, चित्रपटाचे शूटिंग संपन्न झालं, तिथल्या गावकऱ्यांनी सचिनचा वाढदिवस आज एखाद्या सणासारखा साजरा केला.(Tendlya Marathi movie)
===================================
हे देखील वाचा: आले रे आले ‘पोश्टर बॉईज 2’ आले…धूमधडाक्यात झाले सिनेमाचे पोस्टर लाँच
===================================
गावाकडे लोक क्रिकेटच्या खेळावर कसे प्रेम करतात? आणि सचिन तेंडुलकरकडे प्रेरणेचा स्त्रोत म्हणून कसे बघतात? याचा अनुभव घेऊन इस्लामपूरच्या मुलांनी त्यावर पटकथा लिहून चक्क ‘तेंडल्या’ नावाचा सिनेमा बनवला आहे. सचिन तेंडुलकरने स्वतः या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटाला १ राष्ट्रीय पुरस्कार आणि ५ राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत.‘अश्वमेध मोशन पिक्चर्स’च्या माध्यमातून येत्या ५ मे रोजी ‘तेंडल्या’ हा मराठी चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. सुनंदन लेले प्रस्तुत, सचिन जाधव, चैतन्य काळे निर्मित, ‘तेंडल्या’ चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन जाधव, नचिकेत वायकर यांचे आहे.