Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

अखेर ‘कौन बनेगा करोडपती’च्या 16 व्या सीझनची तारीख आली समोर; ‘या’ दिवशी सुरु होणार प्रश्नांचा खेळ
अनेक काळपासून सुपरहिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांचे चाहते बऱ्याच दिवसांपासून त्यांचा क्विझ रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या 16 व्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते, ज्याबद्दल एक मोठे अपडेट समोर येत आहे. तुम्हालाही हा शो आवडत असेल आणि तो कधी सुरू होणार याची तुम्ही वाट पाहत असाल तर आणखी थोडा वेळ तुम्हाला वाट पहावी लागणार आहे कारण बिग बी लवकरच या शोद्वारे तुमच्यासमोर येणार आहेत. कौन बनेगा करोडपती हा प्रसिद्ध रिअॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांना उत्तेजित करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘कौन बनेगा करोडपती 16‘चा नवा प्रोमो आता रिलीज झाला आहे, ज्यात बिग बींची नवी स्टाईल ही पाहायला मिळत आहे.(Kaun Banega Crorepati 16)

प्रोमो पाहिल्यानंतर चाहते ‘केबीसी १६‘ कधी आणि कुठे पाहायचे याची उत्सुकता लागली आहे. नव्या प्रोमोनंतर शोच्या निर्मात्यांनी शोच्या प्रीमियरचा सस्पेन्स दूर केला आहे. ‘कौन बनेगा करोडपती सीझन १६’ पुढील महिन्यात म्हणजेच १२ ऑगस्टपासून सुरू होत आहे. सोनी टीव्ही किंवा सोनी लाईव्ह अॅपवर प्रेक्षकांना हा शो पाहता येणार आहे. आणि या नव्या सीझनची टॅगलाईन आहे, ‘जिंदगी है, हर टर्न, सावल पुचलेगी, देना होगा उत्तर!’ हा रिअॅलिटी शो पुन्हा एकदा सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. ‘कौन बनेगा करोडपती‘ बऱ्याच काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोची जबरदस्त फॅन फॉलोइंग ही आहे. आणि सर्व वयोगटातील लोकांना हा शो पाहायला आवडतो. निर्मात्यांनी आतापर्यंत शोचे अनेक प्रोमो शेअर केले आहेत.

केबीसी 2024 चा पहिला एपिसोड १२ ऑगस्ट रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर प्रसारित होईल. केबीसी सीझन 16 चे प्रमोशन सुरू करण्यासाठी चॅनेलने प्रोमोजची मालिका जारी केली आहे. जर तुम्हालाही सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांची आवड असेल तर ही तारीख आपल्या कॅलेंडरमध्ये मार्क करु शकता.(Kaun Banega Crorepati 16)
===============================
हे देखील वाचा: तो येतोय…आता कल्ला तर होणारच! ‘बिग बॉस मराठी’चा 5 वा सीझन 28 जुलैपासून सुरु होणार
===============================
हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन तर करतोच, शिवाय जगभरातील विविध विषयांचे ज्ञानही देते. यापूर्वी 21 जुलै रोजी सोनी टीव्हीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘कौन बनेगा करोडपती 16′चा अधिकृत प्रोमो जारी केला होता, ज्यात शोच्या प्रीमियरची तारीख आणि वेळेची ही माहिती देण्यात आली होती.