
शाहरुख खानला मागे टाकत रणवीर सिंगच्या Dhurandharने रचला इतिहास; ‘पुष्पा २’ सोबत आता शर्यत सुरु…
बॉक्स ऑफिसवर सध्या एकच चित्रपट धुरळा घालतोय आणि तो म्हणजे रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ (Dhurandhar movie)… ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने चक्क शाहरुख खानच्या ‘जवान’ (Jawan) चित्रपटालाही मागे टाकलं आहे… जगभरात १००० कोटींचा टप्पा गाठणाऱ्या या चित्रपटाने भारतात बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून आपलं नाव कोरलं आहे…
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपट सलग तिसऱ्या आठवड्यातही बक्कळ कमाई करताना दिसत आहे… पहिल्या आठवड्यात २०७.२५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात २५३.२५ कोटी कमवत तिसऱ्या आठवड्यात आता या चित्रपटाची कमाई भारतात ६३३.५० कोटींवर पोहोचली आहे… २०२५ मध्ये विकी कौशलच्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने ६०० कोटींचा टप्पा पार केला होता आणि आता ‘धुरंधर’ने छावालाही मागे टाकत नवा रेकॉर्ड केला आहे… इतकंच नाही तर ‘पठाण’, ‘स्त्री २’ अशा अनेक बॉलिवूड बिग स्टार आणि बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत धुरंधर आता ‘पुष्पा २’ (Pushpa 2) च्या मागोमाग नवा रेकॉर्ड करण्यास सज्ज झाला आहे… (Ranveer Singh Movie Box Office Record)

विशेष म्हणजे ‘धुरंधर’ चित्रपट आता अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटासोबत शर्यत करत आहे… ‘पुष्पा २’ (हिंदी वर्जन) चित्रपटाने देशात ८३० कोटी कमावले असून आता ‘धुरंधर’ त्याच्या पाठोपाठ आहे… जर का ‘धुरंधर’ने ८५० कोटींचा टप्पा पार केला तर तो पहिला भारतीय चित्रपट ठरेल जो देशात १००० कोटी कमवेल आणि १००० कोटी क्लबच्या नवा ट्रेण्ड सुरु करेल….
================================
हे देखील वाचा : Dhurandhar चित्रपटाचा धमाका; रेकॉर्ड्स बघून हैराणच व्हाल!
================================
दरम्यान, ‘धुरंधर’ मध्ये रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आदित्य धर लिखित, दिग्दर्शित आणि सह-निर्मित असलेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग ‘धुरंधर २’ १९ मार्च २०२६ रोजी ईदच्या मुहूर्तावर हिंदी आणि दाक्षिणात्य भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे… (Dhurandhar 2)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi