Sikandar : सलमानच्या सिकंदरने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली बक्कळ कमाई!

‘आदिपुरुष’ मध्ये शूर्पणखाची भूमिका साकारणाऱ्या सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल !
या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते.प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन यांचा आदिपुरुष हा चित्रपट अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना पहायला मिळत आहे. तसेच या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगही जोरदार झाले होते.हा चित्रपटात रामायणाची कथा सांगण्यात आलेली आहे.सीतेचे अपहरण, रामाचे रावणाशी झालेले युद्ध, तसेच सीतेच्या आणि रामाच्या प्रेमाची कथा या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. या सिनेमात प्रभास रामच्या भूमिकेत, सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत , क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत आणि मराठी कलाकार देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत पहायला मिळतात तसेच या व्यतिरिक्त सनी सिंह, सुद्धा या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत आहे. (Tejaswini Pandit As Surpankha)

रामायणातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे शूर्पणखा, जिचे नाक लक्ष्मणाने कापले होते. रामायणातील हे खुप महत्वाच पात्र तर आहेच आणि आदिपुरुष या चित्रपटातसुद्धा ही व्यक्तिरेखा दाखवण्यात आलेली आहे. आणि ही भूमिका एका मराठमोळ्या अभिनेत्रीने साकारली आहे. तेजस्विनी पंडित या अभिनेत्रीने ने चित्रपटात शूर्पणखाची भूमिका साकारली आहे. शूर्पणखा ही सगळ्यांनाच अक्राळविक्राळ राक्षसी म्हणून माहीत आहे. हिच भूमिका तेजस्विनीच्या वाट्याला आली. आणि तिने या भूमिकेला शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मुख्य कलाकार वगळता इतर सर्व कलाकारांबद्दल कोणतीही विशेष माहिती देण्यात आली नव्हती. मात्र, रिलीजनंतर या चित्रपटात कोणकोणत्या कलाकारांनी महत्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत हे समोर आले. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्द अभिनेत्रींच्या यादी मध्ये तेजस्विनी पंडित हे एक नावाजलेले नाव आहे. 37 वर्षीय तेजस्विनी वैयक्तिक आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. तेजस्विनीच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकली तर लक्षात येईल की ती खूप बोल्ड त्याबरोबरच तितकीच साधी सुद्धा आहे.

तेजस्विनी पंडित इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह असते आणि दररोज तिचे फोटो आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आदिपुरुष सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरही तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. आणि तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘जे आयुष्यात कधी केलं नाही, ते चित्रपटात करून घेतलं….म्हणून इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये” अस कैप्शन देत तिने सिनेमातील भूमिकेचे फोटो शेअर केले आहेत. तसेच तिने तिच्या चाहत्यांना आदिपुरुष सिनेमा पाहण्याच सुद्धा आवाहन केले आहे.तिच्या या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहतेमंडळींनीही कमेंट केली आहे.(Tejaswini Pandit As Surpankha)
================================
=================================
आदिपुरुष सिनेमाचा टीझर समोर आल्यानंतर सोशल मीडियावर आदिपुरुष सिनेमाला सातत्याने विरोध होत होता आणि आता लोक चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये काढून टाकण्याची तसेच चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुद्धा करत आहेत.