Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

Akshay Kumar च्या आगामी ‘सरफिरा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर झाले रिलीज; अभिनेत्याच्या लुकचं होतय कौतुक
चित्रपटांमध्ये जबरदस्त अभिनयाने आपला ठसा उमटवणारा अभिनेता अक्षय कुमारला ओळखीची गरज नाही. त्याचा अभिनय आणि चित्रपट दोन्ही चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतात. अक्षय कुमार एका वर्षात एकापेक्षा जास्त चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे, त्याचे अनेक सिनेमे वर्षभरात रिलीज होतात. आता यातच अक्षय कुमारने त्याच्या बहुप्रतीक्षित ‘सरफिरा‘ चित्रपटाविषयी एक नवीन अपडेट शेअर केले आहे. बॉलिवूडचा अॅक्शन हिरो खिलाडी कुमार पुन्हा एकदा आपल्या ‘सरफिरा‘ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांना प्रेरणा देण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षय कुमार आणि राधिका मदान यांच्या आगामी ‘सरफिरा‘ चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.(Akshay Kumar’s Sarfira Movie Poster)

तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे. ‘सरफिरा’च्या पहिल्या पोस्टरमध्ये या अभिनेत्याचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर या सिनेमाचं पहिलं पोस्टरही लोकांना खूप आवडत आहे. अक्षय कुमारने त्याच्या आगामी ‘सरफिरा‘ चित्रपटाचे पहिले पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. यासोबतच त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेवरही पडदा टाकला आहे. पोस्टर शेअर करताना अभिनेता कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करणाऱ्या माणसाची कहाणी, माझ्यासाठी ही एक कथा, एक पात्र, एक चित्रपट, आयुष्यभराची संधी आहे. ‘सरफिरा’चा ट्रेलर १८ जूनला प्रदर्शित होणार असून, १२ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अक्षय कुमार ने शेअर केलेल्या पोस्टरची टॅगलाईन ‘स्वप्न इतके मोठे पाहा की लोक तुम्हाला वेडे म्हणतील’ त्या बरोबरच त्याने ‘माझ्यासाठी ही कथा, पात्र आणि चित्रपट खूप खास आहे.’ असे ही लिहीले आहे.’बेबी’, ‘एअरलिफ्ट’, ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ आणि ‘स्पेशल २६‘ नंतर अक्षय कुमार ‘सरफिरा‘ या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे, ज्यात तो पुन्हा एकदा नव्या लूक आणि स्टाईलमध्ये दिसणार आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अक्षय कुमार हलक्या दाढीत सनग्लासेस घातलेला दिसत आहे. त्याचबरोबर तो आकाशाकडे पाहत आहे आणि त्याच्या सनग्लासेसमध्ये वरच्या विमानाची झलक दिसत आहे, रफ लुकमध्ये तो अतिशय देखणा दिसत आहे.(Akshay Kumar’s Sarfira Movie Poster)
===================================
===================================
या चित्रपटात अक्षय कुमारसोबत राधिका मदानची जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुधा कोंगरा यांनी केले असून कथालेखन सुधा आणि शालिनी उषा देवी यांनी केले आहे, तर संवाद पूजा तोलानी यांचे आहेत. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर अक्षय आणि राधिकाव्यतिरिक्त परेश रावल, सीमा बिस्वास यांसारखे स्टार्स मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अक्षय कुमारचा हा चित्रपट दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याच्या तमिळ चित्रपट ‘सोरारई पोटरु’चा हिंदी रिमेक आहे. अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो ‘वेलकम टू जंगल’, ‘हेरा फेरी 3’ आणि ‘सिंघम अगेन’ व्यतिरिक्त वीर पहारियाच्या ‘स्काय फोर्स’ या चित्रपटातही झळकणार आहे.