Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Bollywood : ६५ वर्षांपूर्वी ‘या’ चित्रपटाच्या गाण्यावर केलेला १० लाखांचा खर्च
आज जरी आधुनिक तंत्रज्ञान आलं असलं तरी ५०-५० वर्षांपूर्वी तुटपुंज्या टॅक्नोलॉजिच्या आधारे ब्लॉकबस्टर चित्रपट तयार केले जात होते… चित्रपट बनवण्यासाठी काही वर्ष जात होती खरी पण त्याचा आऊटपूट हा कल्ट क्लासिक चित्रपटांमध्ये येत होता…तुम्हाला माहित आहे का ६५ वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता जो पूर्ण होण्यासाठी चक्क १४ वर्ष लागली होती… कोणता होता तो चित्रपट जाणून घेऊयात…(Bollywood)

तर, ६५ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या निर्मितीवर तेव्हा लाखो रुपये खर्च केले गेले होते… त्यावेळी फक्त एका गाण्यावर निर्मात्यांनी १० लाखांचा खर्च केला होता…ते गाणं म्हणजे ‘जब प्यार किया तो डरना क्या’…चित्रपटासाठी भव्य सेट उभारले गेले होते आणि हा चित्रपट तयार करायला तब्बल १४ वर्ष लागली होती… ६५ वर्षांपूर्वीचा हा बिग बजेट चित्रपट होता ‘मुघल-ए-आझम’ (Mughal-e-Azam). ज्यावेळी हा रिलीज झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर धमाल उडाली होतीच शिवाय प्रेक्षक तिकीट घेण्यासाठी ५-६ किलोमीटर पर्यंत रांगा लावत होते..(Bollywood Cult Classic Movies)

हिंदी चित्रपटसृष्टीच्या ६०च्या दशकातील हा बिग बजेट चित्रपट होता… के. आसिफ यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून यात पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १९६० मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी आणि तिकीट खरेदी करण्यासाठी चक्क रात्रभर रस्त्यावर झोपायचे आणि सकाळी थिएटरची तिकीटबारी सुरु झाली की तिकीट घेऊन चित्रपट पाहायचे. १.५ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तेव्हा ११ कोटींची कमाई केली होती… ६०च्या दशकातील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता..(Retro News)
================================
हे देखील वाचा: दादा कोंडके यांची हिंदीतील भन्नाट मुशाफिरी…
=================================
मुघलांच्या इतिहासावर चित्रपटाची कथा आधारित होती… खरं तर आजही २१व्या शतकात ‘मुघल-ए-आझम’ चित्रपट, त्यातील गाणी यांची क्रेझ काही औरच आहे… या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड ‘शोले’ (Sholay Movie) चित्रपट येईपर्यंत अबाधित होता.. शोले चित्रपटाने जरी कलेक्शनचा रेकॉर्ड मोडला असला तरी १४ वर्ष तयार होणारा हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे हे नाकारुन चालणार नाही…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi