‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
Heeramandi मधील मनीषा कोईराला आणि शेखर सुमन यांच्यात चित्रित केलेला इंटिमेट सीन पटकथेचा भाग नव्हता?
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी‘ या वेब सीरिजला संमिश्र प्रतिसाद मिळाताना दिसत आहे. पण या सीरिजमध्ये मल्लिका जानची भूमिका साकारणारी अभिनेत्री मनीषा कोईराला हिचे प्रचंड कौतुक होत आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हीरामंडी या सीरिजमध्ये मनीषा कोईराला एका वेश्याची भूमिका साकारत आहे. नुकताच मनीषाने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत हीरामंडी सीरिजबद्दलची एक गोष्ट सांगितली ती म्हणाली की, हीरामंडीमधील अभिनेता शेखर सुमनसोबतचा तिचा विचित्र इंटिमेट सीन सुरुवातीला स्क्रिप्टचा भाग नव्हता. संजय लीला भन्साळी यांना नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्यातलाच एक भाग हा सीन होता.(Manisha Koirala And Shekhar Suman intimate scene)
अभिनेत्री मनीषा कोईराला म्हणाली ‘मी नेपाळमध्ये बागकाम करत असताना संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसमधून मला फोन आला. संजय फोनवर म्हणाला, ‘मनीषा तुझ्यासाठी चांगली भूमिका आहे, फक्त स्क्रिप्ट वाच.” मला ते ऐकून खुप आनंद झाला कारण मी त्यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न पाहणं खरतर सोडून दिलं होतं. ती पुढे म्हणाली की, “संजय जे काही काम करतो, तो नक्कीच काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे या सीनबद्दलही रिहर्सल सुरू असताना ते काहीतरी नवं असावं.
===================================
हे देखील वाचा: 2 वर्षांच्या डेटिंगनंतर Aditya Roy Kapur आणि Ananya Pandey यांचे ब्रेकअप?
===================================
याआधी शेखर सुमन यांनी ही इन्स्टाग्रामवर हा सीन शेअर करत लिहिलं होतं की, “मी तुमच्यासोबत एक सीन शेअर करत आहे जो अनोखा आणि अकल्पनीय आहे, जरी तो तुम्हाला हास्यास्पद आणि विचित्र वाटत असला तरी त्यामागे त्याची मार्मिकता आणि करुणा दडलेली आहे.” उच्चभ्रूपदाच्या शेवटच्या पदावर राहण्यासाठी आतुर असलेला आणि तरीही ब्रिटिश राजवटीचा गुलाम असलेला पडलेला नवाब. मल्लिका त्यांचा वापर करत आहे हे त्याला माहीत आहे पण तरीही तो त्या तवायफशी जोडलेला राहतो आहे.(Manisha Koirala And Shekhar Suman intimate scene)
एका मुलाखतीत शेखर सुमन यांनी स्वत:ची तुलना आमीर खान आणि दिलीप कुमार यांच्याशी केली होती. ते फक्त चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात होते. संजयने आतापर्यंत रेड लाईट एरिया किंवा तवायफवर अनेक सिनेमे केले आहेत. पीरियड ड्रामा हीरामंडीपासून ते आलिया भट्टच्या गंगूबाईपर्यंत त्यांनी कुख्यात रेड लाईट एरिया कामाठीपुऱ्याची कहाणी दाखवली आहे.याचबरोबर देवदासमध्ये अभिनेत्री माधुरी दिक्षीतला तवायफ चंद्रमुखी बनवण्यात आले होते तसेच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी सावरियामध्येही याच भूमिकेत राणीची ओळख करून दिली होती.