The Kerala Story सिनेमाची काही दिवसातच तूफान कमाई; ‘द कश्मीर फाइल्स’लाही टाकले मागे
गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाहत्यांची मने जिंकत आहे.अगदी मर्यादित बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटावरून बराच वाद झाला होता, ज्यामुळे अदा शर्मा स्टारर असलेला चित्रपट खूपच चर्चेत आला होता. दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपला विक्रम केला.आणि अदा शर्माच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एका दिवसात तब्बल 8 कोटींचा गल्ला जमवला असून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी चित्रपटाच्या कमाईत जबरदस्त वाढ झालेली पहायला मिळाली.(The Kerala Story)
‘द केरला स्टोरी’ वरून निर्माण झालेला वाद जसजसा वाढत आहे, तसतशी लोकांची उत्सुकता वाढतेय आणि हे चित्रपटगृहात स्पष्टपणे दिसून येत आहे. दुसऱ्या दिवशी ५० टक्के वाढ घेत ‘द केरळ स्टोरी’ने सुमारे १२.५० कोटींची कमाई केली. आणि त्यानुसार या चित्रपटाने दोन दिवसांत एकूण 20.53 कोटींची कमाई केली आहे. रविवारी त्याच्या गल्ल्यात आणखी वाढ झाली आणि येण्याऱ्या दिवसात कमाईच्या आकड्यात तूफान वाढ अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वर्ल्ड ऑफ माउथवरही हा चित्रपट सुरू आहे. प्रेक्षक एकमेकांकडून चित्रपटाचे कौतुक ऐकून चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.
‘द केरळ स्टोरी’चा दोन दिवसांत चित्रपटाच्या कमाईत एवढी वाढ झाल्याने चित्रपटाच्या यशाचे संकेत मिळत आहेत.तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी केरळ स्टोरी आपल्या राज्यात करमुक्त करण्याची घोषणा केली होती. यामागचे कारण म्हणजे हा चित्रपट समाजाला जागृत करण्याचे काम करत आहे, विशेषत: मुलींनी हा चित्रपट नक्की पहावा, तसेच एक व्हिडिओ शेअर करत हा चित्रपट लव्ह जिहादच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे.(The Kerala Story)
=====================================
=====================================
या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद आणि राजकारण यामुळे हा चित्रपटाची तुलना ‘द काश्मीर फाइल्स’शी केली जात आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ने पहिल्या दिवशी ३.५५ कोटींची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी ८.५० कोटींची कमाई केली होती. पण ‘द केरळ स्टोरी’ने जगभरात दोन दिवसांत २० कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटांच्या कमाईत बराच फरक आहे.