The Kerela Story सिनेमातील अभिनेत्री अदा शर्माने अपघातानंतर दिली प्रतिक्रिया
‘द केरळ स्टोरी’ची अभिनेत्री अदा शर्माच्या कारचा रविवारी (१४ मे) रोजी अपघात झाला. ‘द केरळ स्टोरी’ चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्यासोबत हिंदू एकता यात्रेत सहभागी होण्यासाठी अदा करीमनगरला जात होती. या प्रवासाला जात असताना त्यांचा अपघात झाला. अपघाताची ही बातमी ऐकल्यानंतर अदाचे चाहते तिच्या तब्येतीबाबत खूप चिंतेत आहेत. अखेर आता अदा शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत तिची हेल्थ अपडेट शेअर केली आहे. अदा ने तिच्या ट्वीट मध्ये लिहिले आहे, ‘मित्रांनो, मी ठीक आहे, आमच्या अपघाताच्या बातम्या प्रसारित होत असल्याने आम्हाला बरेच संदेश मिळत आहेत. आमची संपूर्ण टीम आणि आम्ही सर्व ठीक आहोत. त्यात गंभीर असे काहीच नाही. आमच्याबद्दल चिंता व्यक्त केल्याबद्दल सर्वांचे आभार.'(The Kerala Story)
सध्या केरळ स्टोरीवरून वाद सुरू आहे. ‘द केरळ स्टोरी’ प्रदर्शित झाल्यापासून काही लोक याला कडाडून विरोध करत आहेत. चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्माला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आलेली आहे. या चित्रपटात चुकीची तथ्ये दाखवण्यात आली आहेत, असे लोकांचे म्हणणे आहे. या चित्रपटात लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांसारखे मुद्दे दाखवण्यात आले आहेत. चित्रपटात तीन मुलींची गोष्ट दाखवण्यात आली आहे. इस्लाम धर्म स्वीकारून आयसिस मध्ये भरती होणाऱ्यांना दहशतवादी बनवले जाते, असे ही दाखवण्यात आलेले आहे. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचेही म्हणणे आहे की, या चित्रपटाचा हेतू केरळची बदनामी करण्याचा आहे.
केरळमधून बेपत्ता झालेल्या ३२,000 मुलींचे धर्मांतर करून त्यांना सिरियात पाठवून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा दावा या चित्रपटाच्या माध्यमातून केला जात आहे. या चित्रपटात असे अनेक सीन्स आहेत जे धक्कादायक आहेत. या चित्रपटाला राजकीय पक्ष आणि गटांकडूनसुद्धा विरोध होत आहे. हा चित्रपट वस्तुस्थितीवर आधारित नसून मुस्लिम समाजाविरुद्ध द्वेष पसरवणारा आहे, असा त्यांचा दावा आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी ही सातत्याने केली जात आहे.(The Kerala Story)
==============================
हे देखील वाचा: The Kerala Story सिनेमाची काही दिवसातच तूफान कमाई; ‘द कश्मीर फाइल्स’लाही टाकले मागे
==============================
‘द केरळ स्टोरी’ची कथा परदेशात मुलींना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करून त्यांना इसिसचे दहशतवादी बनविण्यास भाग पाडले जाते. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने केला आहे. या सिनेमाने रिलीजच्या 10 दिवसांत 135 कोटींची कमाई केली आहे.