‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
ऋषी कपूर यांची शेवटची आठवण – “शर्माजी नमकीन”
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची कमतरता फिल्मी जगताला कायम जाणवणार आहे. बाल कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले ऋषी कपूर (Rishi Kapoor) त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत बॉलिवूडमध्ये सक्रीय होते. “शर्माजी नमकीन” या चित्रपटामध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती. मात्र दुर्दैवानं हा चित्रपट पूर्ण होण्याआधीच, ३० एप्रिल रोजी ऋषी कपूर आपल्यामधून निघून गेले. त्यामुळे त्यांचा “शर्माजी नमकीन” (Sharmaji Namkeen) हा शेवटचा चित्रपट म्हणावा लागेल.
या चित्रपटाचं जवळपास सत्तर टक्के चित्रीकरण पूर्ण झालं होतं. आता हा चित्रपट ऋषी कपूर यांच्याशिवाय पूर्ण कसा होणार??? हा प्रश्न निर्मात्यांना पडला होता. मात्र या प्रश्नाचं अनोख उत्तर चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलं आहे. “शर्माजी नमकीन” या चित्रपटाचे उर्वरीत चित्रीकरण पूर्ण होण्याच्या तयारीतच आहे.
हे नक्की वाचा: ऋषी कपूर यांच्या आयुष्यातील या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
यात ऋषी कपूर यांची भूमिक परेश रावल करणार आहेत. ऋषी कपूर यांचा मोठा चाहता वर्ग आहे. या त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांचा हा शेवटचा चित्रपट मोठी पर्वणी ठरणार आहे. त्यामुळेच ऋषी कपूर गेल्यावर मुळ चित्रपटाच्या कथेमध्ये कुठलाही बदल न करता उर्वरीत चित्रीकरणात त्यांच्या जागी परेश रावल हे त्यांची भूमिका निभावणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत असा हा पहिलाच प्रयोग असेल. ऋषी कपूर यांच्या जन्मदिनादिवशी, म्हणजेच ४ सप्टेंबर रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज करण्यात येणार आहे.
“शर्माजी नमकीन” ही एका साठ वर्षाच्या माणसाची कहाणी आहे. यात ऋषी कपूर यांच्यासोबत जुही चावलाही (Juhi Chawla) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मैकगफिन पिक्चर्स सोबत रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर या चित्रपटाचे निर्माते आहेत. हितेश भाटीया दिग्दर्शन करत आहेत. ऋषी कपूर यांच्या अचानक निधनानं चित्रपटाचं संपूर्ण युनिट चित्रपट कसा पूर्ण करायचा या चिंतेत होतं. मात्र आता आधुनिक तंत्राचा वापर करत आणि परेश रावल यांच्या साथीनं चित्रपट पूर्ण करण्यात येत आहे.
“शर्माजी नमकीन” मध्ये आता प्रगत वीएफएक्सचा वापर करण्यात येणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाही तर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात येईल. ऋषी कपूर यांना या चित्रपटाद्वारे आदरांजली वाहण्याचा निर्णय “शर्माजी नमकीन” च्या टिमनं केला आहे. या नव्या तंत्राच्या वापरामुळे चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. फरहान अख्तरचा टच असलेला “शर्माजी नमकीन” हा एक साठ वर्षाच्या माणसाच्या आयुष्यातील गंमतीजमातीवर आधारीत चित्रपट आहे. ऋषी कपूर यांच्या या शेवटच्या चित्रपटासाठी चाहत्यांना सप्टेंबर महिन्याची वाट पहावी लागणार आहे.
हे देखील वाचा: ऋषीकपूर – डिम्पल चा बॉबी ४७ वर्षाचा