Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Asrani यांच्या पार्थिवावर तातडीने अंत्यसंस्कार का केले?
ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं… त्यांच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे… २० ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला… अगदी त्याच दिवशी तातडीने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले… दरम्यान, अंत्यविधी तडकाफडकी का केले गेले यावर आता त्यांच्या मॅनेजरने खुलासा केला आहे…
असरानी यांचे मॅनेजर बाबूभाई थीबा यांनी ‘नवभारत टाइम्स डॉट कॉम’शी बोलताना प्रतिक्रिया दिली की,”१५-२० दिवसांपूर्वी असरानी यांना अशक्तपणा जाणवत होता.. काही दिवसांपासून त्यांना श्वास घेताना त्रास होत होता आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईतील जुहू याठिकाणी असणाऱ्या आरोग्य निधी रुग्णालयात असरानी यांचे निधन झाले. त्यांच्या फुफ्फुसांत पाणी झाले होते, PTI ने डॉक्टरांच्या हवाल्याने हे अपडेट दिले”…

पुढे बाबूभाईंनी सांगितले की, ‘२० ऑक्टोबरला दुपारी ३.३० च्य सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांच्या पार्थिवावर रात्री ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पत्नीने मला सांगितले की, त्यांना कोणालाही याविषयी सांगायचे नव्हते. त्यांनी (असरानी यांनी) त्यांच्या पत्नीला सांगितले होते की, सर्वकाही शांततेत पार पाडा, कोणालाही काही सांगू नका”….
================================
हे देखील वाचा : Govardhan Asrani : भारतीय चित्रपटसृष्टीतील हास्यवीर!
================================
दरम्यान, असरानी यांनी आयुष्यभर लोकांना हसवत आनंदी ठेवलं आणि जाता जाता देखील दिवाळीच्या शुभेच्छा देत लोकांना आनंदी राहा असं सांगत त्यांनी मात्र जगाचा निरोप घेतला… वयाच्या ८४ व्या वर्षी देखील तोच उत्साह आणि उमेद असणाऱ्या असरानी यांना भावपूर्ण आदरांजली.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi