Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

एका सिनेमाच्या प्रीमियरमुळे वाचले चक्क संपूर्ण युनिटचे प्राण!
आयुष्यात घडणाऱ्या काही घटना अगदी अनाकलनीय अशा असतात. आपण विचार देखील करू शकत नाही. पण कधी कधी अनपेक्षितपणे एखादी होणारी अनीस्ट गोष्ट अगदी सहजरीत्या टळली देखील जाते. ही गोष्ट टाळण्यासाठी जाणीवपूर्वक काहीही प्रयत्न केलेले नसतात. ह्याला दैवी संकेत म्हणायचे की, आणखी काय पण असे प्रसंग आयुष्यात आले तर ,कधी कधी दैवाचा विश्वास नक्कीच वाढीस लागतो! निर्माता दिग्दर्शक बोनी कपूर यांना एकदा असाच अनुभव आला होता. अक्षरशः मृत्यू त्यांची वाट पाहत होता पण अनपेक्षित रित्या काही गोष्टी घडल्या आणि तो प्रसंग टळला गेला. खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे.
२००४ साली बोनी कपूर शाहिद कपूर आणि करीना कपूरला घेऊन एक चित्रपट बनवत होते. चित्रपटाचं नाव होतं ‘मिलेंगे मिलेंगे’. हा सिनेमा दिग्दर्शित करणार होते सतीश कौशिक. सिनेमा स्टार कास्ट फायनल झाली. शूटिंगचे शेड्युल ठरले. दिल्ली आणि दुबई येथे सुरुवातीचे शूट झाले.आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थायलंडमध्ये या सिनेमाचे शूटिंग होणार होते. त्यासाठी सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्स थायलंडला जाण्यासाठी निघणार होते. पण त्याच आठवड्यामध्ये शाहिद कपूर यांच्या ‘दिल मांगे मोर’ या चित्रपटाचा प्रीमियर (Cinema premiere)मुंबईमध्ये होता. या प्रीमियरसाठी शाहीदला थांबायचे होते पण बोनी कपूरने सिनेमाचे शूटिंग शेड्युल थायलंडमध्ये ठरवले होते. त्यामुळे काय करावे? असा प्रश्न त्याच्यापुढे होता. आपल्या एकट्या पायी काही बोनी कपूर शूटिंग पोस्टपोन करणार नाहीत याची त्याला खात्री होती. तरी एकदा बोनी कपूरला विचारायला काय हरकत आहे असा त्याने निश्चय केला. आणि त्याने बोनी कपूर यांना विचारले,” या आठवड्यात ३१ डिसेंबर माझ्या ‘दिल मांगे मोर’ या सिनेमाचा प्रीमियर(Cinema premiere) मुंबईमध्ये आहे.मला या प्रीमियरला उपस्थित रहाणे गरजेचे आहे. आपण थायलंड मधील शूटिंग थोडे पोस्ट पोन करू शकतो का?” नकाराची शंभर टक्के खात्री असताना देखील शाहिद कपूर हे धाडस केले होते. पण काय आश्चर्य… बोनी कपूर यांनी कसे काय कुणास ठाऊक पण,” ठीक आहे. आपण ‘मिलेंगे मिलेंगे’ या चित्रपटाचे शूटिंग पोस्टपोन करूया. तू तुझा प्रीमियर अटेंड कर. त्यानंतर आपण थायलंडला जाऊ!” बोनी कपूरच्या या निर्णयाने शाहिद कपूरला खूप आनंद वाटला.

या निर्णयामुळे एक प्रचंड मोठी दुर्घटना टळली. ज्यामुळे संपूर्ण ‘मिलेंगे मिलेंगे’ टीमचे प्राण वाचले! कारण याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ डिसेंबर २००४ रोजी हिंदी महासागरात भयंकर त्सुनामी चा प्रकोप झाला आणि थायलंडला जिथे हे सर्व युनिट उतरणार होते आणि शूटिंग करणार होते ती जागा आणि ते हॉटेल संपूर्णपणे नष्ट झाले. तिथे असणाऱ्या सर्व गोष्टींना अक्षरशः जलसमाधी मिळाली. टीव्हीवर ही बातमी पाहून बोनी कपूर ने सुटकेचा नि: श्वास सोडला. केवळ त्याच्या एका निर्णयामुळे संपूर्ण युनिटचे प्राण वाचले होते. आणि हा निर्णय घ्यायला कारण होतं शाहिद कपूरच्या च्या ‘दिल मांगे मोर’ या सिनेमाचा प्रीमियर(Cinema premiere)! गंमत म्हणजे आज ‘दिल मांगे मोर’ आणि ‘मिलेंगे मिलेंगे’ या दोन्ही सिनेमाची कोणालाही आठवण नाही पण या निमित्ताने एका होणाऱ्या संभाव्य भयंकर दुर्घटने पासून हे सर्व युनिट वाचले हीच एक महत्त्वाची घटना म्हणता येईल. जाता जाता या दोन चित्रपटांबद्दल थोडसं करीना कपूर आणि शाहीद कपूर यांची खरं तर रील लाईफ आणि रियल लाईफ मध्ये देखील चांगली केमिस्ट्री जुळली होती. फिदा, ३६ चायना टाऊन,चुप चुपके, जब वुई मेट,मिलेंगे मिलेंगे हे त्या दोघांचे सिनेमे आले होते. नंतर ब्रेक अप झाले. करीना सैफ कडे वळाली.
==========
हे देखील वाचा :जेव्हा मेहमूदचा आत्मविश्वास हरवला तेव्हा जॉनी वॉकरनी त्याला सांगितलं…
========
नंतर २०१६ साली ‘उडता पंजाब’ या सिनेमात दोघांनी एकत्र भूमिका केली. ‘मिलेंगे मिलेंगे’ हा ब्रेक अप पूर्वी साईन केलेला शेवटचा सिनेमा. हा सिनेमा बनायला तब्बल सहा वर्षे लागली. ९ जुलै २०१० रोजी प्रदर्शित झाला आणि फ्लॉप ठरला. शाहीद कपूर आणि आयेशा टाकिया यांचा ‘दिल मांगे मोर’ हा सिनेमा अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केला होता. रोमँटिक कॉमेडी जॉनर असलेला हा सिनेमा हिमेश रेशमिया यांनी स्वरबध्द केला होता. ३१ डिसेंबर २००४ रोजी प्रदर्शित झालेला हा ही सिनेमा बॉक्स ऑफिस वर टिकला नाही.