
गुलशन कुमार यांच्या Hanuman Chalisa ने रचला इतिहास; ठरला YouTube वर ५०० कोटी वेळा पाहिला जाणारा पहिला भारतीय व्हिडिओ
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात संगीत क्षेत्राचं फार महत्वाचं योगदान आहे… आणि डिजीटल म्युझिकच्या क्षेत्रात गुलशन कुमार यांच्या टी-सीरीजने इतिहासच रचला आहे… चित्रपटांच्या गाण्यांसोबतच भक्तीपर गीतांचा नजराणा टी-सीरीजने दिला आहे… अशातच गुलशन कुमार यांच्या ‘टी-सिरीज’ निर्मित ‘श्री हनुमान चालीसा’ या व्हिडिओने यूट्यूबवर ५०० कोटी व्ह्यूजचा टप्पा पार करत नवा रेकॉर्ड केला आहे… विशेष म्हणजे इतके अब्ज व्हयुज मिळवणारा हा पहिला भारतीय व्हिडिओ ठरला आहे…

हनुमान चालीसाचा हा भक्तीपर व्हिडिओ १० मे २०११ ला यूट्यूबवर अपलोड केला होता… या व्हिडिओमध्ये टी-सिरीजचे संस्थापक दिवंगत गुलशन कुमार असून ही चालीसा प्रसिद्ध गायक हरिहरन यांनी गायली आहे… तर ललित सेन यांनी ही चालीसा संगीतबद्ध केली आहे…. १४ वर्षांच्या काळात या व्हिडिओने ५,००६,७१३,९५६ व्ह्यूजचा आकडा पार केला असून यूट्यूबच्या सर्वाधिक पाहिलेल्या जगातील व्हिडिओच्या टॉप १० यादीत हा व्हिडिओ ही सामील झाला…
================================
हे देखील वाचा : “मला स्वप्न मराठीतच पडतात”; नाव न घेता Nana Patekar यांनी पिळगांवकरांचे पिळले कान!
================================
मिळालेल्या माहितीनुसार, ‘श्री हनुमान चालीसा’ ने गाठलेल्या या आकड्याच्या जवळपास कोणताही इतर भारतीय व्हिडिओ पोहोचू शकला नाही. या व्हिडिओच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर पंजाबी आणि हरियाणवी गाण आहे… तर ‘५२ गज का दामन’ आणि तमिळ गाणं ‘रौडी बेबी’ प्रत्येकी १.७ अब्ज व्ह्यूजसह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi