Gurmeet Choudhary फिटनेससाठी अभिनेता गुरमीत चौधरीने केला दीड वर्षापासून भात,
Prathmesh Parab “टाइमपास” सिनेमाची ११ वर्ष; ‘दगडू’ने खास पोस्ट शेअर करत व्यक्त केली कृतज्ञता
मनोरंजनविश्वात आजच्या घडीला आपण पाहिले तर अनेक लहान मोठे कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. ज्यांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले तर काहींना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले. मात्र अनेकांनी परिस्थितीशी दोन हात करत या क्षेत्रात आपल्या मेहनतीच्या आणि प्रयत्नांच्या जोरावर या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. (Prathmesh Parab)
या ग्लॅमर असलेल्या मनोरंजनक्षेत्रात दिसायला अतिशय चांगल्या लोकांनाच संधी मिळते. सामान्य दिसणाऱ्या लोकांसाठी या क्षेत्रात मुख्य भूमिका कधीच नसतात. त्यांना नेहमीच सध्या, साइडच्या भूमिका दिल्या जातात. मात्र असे अनेक कलाकार देखील या क्षेत्रात आहे, ज्यांनी त्यांच्या रूपाच्या जोरावर नाही तर प्रतिभेच्या जोरावर या क्षेत्रात नावलौकिक कमावला आहे. यातलाच एक लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रथमेश परब (Prathmesh Parab) अर्थात आपला लाडका दगडू (Dagdu).
प्रथमेश हा अनेक अशा कलाकारांसाठी उत्तम उदाह्रण आहे, ज्यांच्याकडे रूप नसले तरी प्रतिभा नक्कीच आहे. शिवाय प्रथमेशने हे देखील सगळ्यांना दाखवून दिले की, जर प्रतिभा असेल तर कोणतीच बाब तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी अडचण ठरत नाही. प्रथमेश हे याचे चांगले उदाहरण आहे. याच प्रथमेशला मराठी मनोरंजनविश्वात मोठी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. (Latest Marathi News)
प्रथमेशने आजवर अनेक मालिकांमध्ये आणि नाटकांमध्ये काम केले आणि प्रसिद्धी मिळवली. त्याने रवी जाधव यांच्या बालक पालक सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या सिनेमात त्याने त्याच्या अभिनयाने चांगलीच प्रसिद्धी मिळवली. मात्र २०१४ साली आलेल्या ‘टाइमपास‘ (Timepass) या सिनेमातून त्याला अफाट लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली आणि त्याला दगडू ही नवीन ओळख मिळाली.
‘टाइमपास’ या सिनेमामुळे प्रथमेशला खरी ओळख मिळाली. याच सिनेमाला नुकतेच ११ वर्ष पूर्ण झाले आहे. (Timepass Movie Completed 11 Years) याच निमित्ताने प्रथमेशने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट आणि प्रथमेश सध्या खूपच चर्चेत आला आहे.
प्रथमेशने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “ए, तो बघ दगडू!’, ‘दगडू, एक सेल्फी काढू का?’, ‘दगडू, आता नवीन कोणता सिनेमा येतोय?’ आज ११ वर्षानंतरही, दगडू लोकांच्या लक्षात आहे, या प्रेमाबद्दल मी खरंच खूप कृतज्ञ आहे. (Prahmesh Parab News)
माझं आयुष्य ३६० डिग्रीने बदलणारी एक संधी, एक व्यक्तिरेखा आणि त्यानंतर माझ्या आयुष्याचा झालेला अविभाज्य भाग! एखादा सिनेमा हिट झाला तरीही हा दगडू मला आठवतो किंवा एखादा सिनेमा फारसा चालला नाही तरीही! सिनेमा हिट झाल्यावर, ‘टाईमपास’च्या वेळचे ‘हाऊसफुल’चे फलक आठवतात.
‘आई, बाबा आणि साईबाबा शप्पथ’, असंच काम करत रहा, असं म्हणत दगडू माझं कौतुक करत असेल हे जाणवतं. त्याउलट जर एखादा सिनेमा फारसा चालला नाही तर, तू टेन्शन नको घेऊस रे, टेन्शनला, ‘चल ए, हवा आने दे’ असं म्हण आणि पुढे जा, असंही म्हणणारा दगडू मला जाणवतो. मला खरी ओळख दिली ती या दगडूने… यासाठी रवीसर, मेघना मॅडम आणि प्रियदर्शन दादाचे खूप खूप आभार…”
============
हे देखील वाचा : Kiran Mane किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिनी खास पोस्ट
============
प्रथमेशच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या देखील या सिनेमाशी संबंधित अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. सोबतच प्रथमेशच्या भूमिकेचे त्याच्या अभिनयाचे देखील त्यांनी कौतुक केले आहे.
दरम्यान प्रथमेशच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्याने मराठीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहेत. सोबतच तो ‘दृश्यम’ सिनेमात आणि ‘ताजा खबर’ या वेबसिरीजमध्ये देखील झळकला आहे. आगामी काळात तो ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’, ‘मुंबई लोकल’, ‘सुसाट’, ‘गाडी नंबर १७६०’ आणि ‘हुक्की’ या चित्रपटांसोबतच अनेक हिंदी प्रोजेक्टमध्ये देखील दिसणार आहे.