Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dheeraj Kumar : संघर्षातून यशाकडे

अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘Family Man 3’;

‘दिवसाला ४० चपात्या आणि १.५ लीटर दूध’ Actor Jaideep Ahlawaचा

Aatali Batmi Phutali Teaser : खुनाच्या सुपारीभोवती फिरणारी भन्नाट कथा; १९

‘या’ कारणामुळे Mrunal Dusanis ने कलविश्वातल्या मुलाशी लग्न नाही केलं;

Parinati: अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी ही भन्नाट जोडी एकत्र झळकणार !

Jaideep Ahlawat : “‘नटसम्राट’ हिंदीत करण्याची इच्छा”

सिनेमाचा हिरो Rajesh Khanna पण किशोर कुमार यांचे गाणे दुसऱ्याच

Maalik : राजकुमार रावच्या मालिक चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा?

Dheeraj Kumar : ‘रोटी, कपडा और मकान’ चित्रपट फेम ज्येष्ठ

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

टॉलिवूडचा प्रिन्स….

 टॉलिवूडचा प्रिन्स….
आठवणींच्या पानावर

टॉलिवूडचा प्रिन्स….

by सई बने 10/08/2020

टॉलिवूड अर्थात दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीचा प्रिन्स म्हणून ओळखला जाणारा महेशबाबू हा अभिनेता महाराष्ट्राचा जावई आहे. अभिनेता, निर्माता आणि अनेक सेवाभावी संस्थामधून काम करणारा महेशबाबू याला तेलगू चित्रपट सृष्टीचा चेहरा म्हणूनही ओळखलं जातं.

महेशबाबू यांचे वडील कृष्णा, हे तेलगू चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. कृष्णा यांना पाच मुलं. वडील प्रसिद्ध अभिनेता असले तरी या प्रसिद्धीचा मुलांच्या शिक्षणावर काहीही परिणाम होऊ नये म्हणून कृष्णा यांनी मुलांना प्रसिद्धीपासून दूर ठेवलं होतं. मात्र महेशबाबू चित्रपट सृष्टीपासून आपल्याला दूर ठेऊ शकले नाहीत. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून नीडा हा त्यानं चित्रपट केला. याशिवाय महेशबाबू आणखी काही चित्रपटातून बालकलाकार म्हणून पडद्यावर येत होते. मात्र नंतर वडीलांनी त्यांना आधी शिक्षण पूर्ण करण्याचा आग्रह केला. त्यानुसार पदवी घेतल्यावर महेशबाबू पुन्हा टॉलिवूडकडे वळले.

त्यांना घरातून अभिनयाचं बाळकडू मिळालं असलं तरी महेशबाबू यांनी दिग्दर्शक एल. सत्यनंद यांच्या अॅकाडमीमध्ये प्रवेश घेतला. तिथे अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. सफाईदार तेलगू भाषा आत्मसात केली. 1999 मध्ये राजाकुमरुडू या चित्रपटातून महेशबाबूने तेलगू चित्रपटात हिरो म्हणून प्रवेश केला. त्यात त्याची सहअभिनेत्री होती प्रिती झिंटा. हा महेशबाबूचा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला. या चित्रपटासाठी महेशबाबूला पहिला मानाचा नंदी पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याच्याकडे चित्रपटांचा ओघ चालू झाला.

पण पहिल्या चित्रपटासारखे यश मिळाले नाही. मात्र 2003 मध्ये आलेल्या ओक्काडू या चित्रपटाने मागचे सगळं अपयश धूवून काढलं…ब्लॉकबस्टर झालेला हा चित्रपट अन्य भाषांमध्येही डब करण्यात आला. एका कबड्डी खेळडूची भूमिका महेशबाबूने केली होती. या चित्रपटानं त्याला सुपरस्टारचा दर्जा दिला. त्यानंतर महेशबाबू यांनी सुपरहीट चित्रपटांची मालिकाच सुरु केली. त्यामध्ये अथाडू, पोकिरी, ननेक्कोडाईन, सरीमंथूडू, दुकडू, असे अनेक सुपरहिट चित्रपट केले. बिझनेसमन या त्याच्या चित्रपटानं तर भारतातच नव्हे परदेशातही कमाईचा विक्रम केला. महेशबाबू हा रजनीकांतनंतर दक्षिण भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता असल्याची नोंद झाली. त्याच्या श्रीमंथानू हा पंचवीस वर्षांतला पहिला तेलुगु मल्टीस्टारर चित्रपट ठरला.

भारत अने नेनु हा महेशबाबूचा राजकीय अॅक्शन ड्रामापट आहे. यात त्यांनी मुख्यमंत्र्याची भूमिका केली आहे. या चित्रपटानं तब्बल 225 कोटीची कमाई केल्याची बोलले जाते. आत्तापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणा-या पाच तामिळ चित्रपटात भारत अने नेनु या चित्रपटाचा समावश झाला. या चित्रपटासाठी महेशबाबूला अभिनयासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महेशबाबू याच्या यशाचे प्रमाण म्हणजे त्यांना मिळालेले पुरस्कार…आठ नंदी पुरस्कार, पाच फिल्मफेयर पुरस्कार, तीन दक्षिण भारतीय अंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी पुरस्कार त्याच्या नावावर जमा आहेत.

याशिवाय महेशबाबू एन्टरटेन्मेंट या प्रॉडक्शन हाऊसचा मालक आहे. हा तेलगू सुपरस्टार हिल ए चाईल्ड नावाचे ट्रस्टही चालवतो. चित्रपट वितरण क्षेत्रातही तो काम करतो. आपली मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि महेशबाबू यांचं लग्न 2005 रोजी झालं. या दोघांना गौतम आणि सितारा अशी दोन मुलं आहेत. महेशबाबू अभिनेता आहेच शिवाय अनेक सामाजिक कामांमध्येही त्यांचा मोठा समावेश असतो. हिल ए चाईल्ड फांऊडेशनच्या माध्यमातून अनेक गरजू मुलांच्या ऑपरेशनचा खर्च तो उचलतो. आपल्या एकूण कमाईचा 30 टक्के वाटा महेशबाबू समाजसेवी संस्थांना देतो. काही गावं दत्तक घेऊन त्यांचा विकासही बाबूनं केला आहे.



महेशबाबू किती लोकप्रिय आहे हे त्याच्या सोशलमिडीया अकांऊंटवरुन लक्षात येतं. त्याच्या फॅन फॉलोअरची संख्या कोटीच्या पुढे आहे. शहारुख खान, सलमान खान यांच्या पेक्षा तो खूप पुढे आहे. सध्या महेशबाबू लॉकडाऊनमध्ये त्याच्या आगामी चित्रपटांची तयारी करतोय. त्यासाठी त्याने केलेले व्हिडीओ सोशलमिडीयावर चांगलेच प्रसिद्ध झालेत. आगामी वर्षात येणारा त्याचा सरकारु वारी पट्टा हा चित्रपट चर्चेत आहे. किर्थी सरेश त्याची सहअभिनेत्री आहे. या चित्रपटाचा निर्माताही महेशबाबू आहे. वयाची पंचेचाळीशी पार करणरा हा अभिनेता अजूनही सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता म्हणून आपला दबदबा कायम ठेऊन आहे. महेशबाबूला त्याच्या पुढील कारकीर्दीसाठी कलाकृती मिडीयातर्फे शुभेच्छा….
सई बने..

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.